Air Indiaच्या विमानांमध्ये 'रोल्स रॉयस'ची इंजिन्स! टाटांनी नोंदवली रेकॉर्डब्रेक ऑर्डर

विमानांमध्ये रोल्स रॉयसची इंजिन्स बसवल्याचे अनेक फायदे आहे.
Rolls Royce_Air India
Rolls Royce_Air India

नवी दिल्ली : रोल्स रॉयस या आलिशान कार बनवणाऱ्या कंपनीनं मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार कंपनीला एअर इंडियाकडून 68 Trent XWB-97 इंजिन्ससाठी ऑर्डर मिळाली आहे. या इंजिन्सची ही आजवरची सर्वात मोठी ऑर्डर असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. त्याचबरोबर एअर इंडियानं 12 Trent XWB-84 इंजिन्सचीही ऑर्डर कंपनीकडं नोंदवली आहे. एअरबस कंपनीच्या विमानांसाठी Airbus A350-900 साठी तो एकमेव इंजिन पर्याय आहे. (Rolls Royce engines will be in Air India planes Record breaking order recorded by Air India)

Rolls Royce_Air India
Viral Video: काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात पाहुण्यांकडून गोळीबार करत जल्लोष; व्हिडिओ व्हायरल

पहिल्यांदाच भारतीय विमान कंपनीनं Trent XWB इंजिन्सची ऑर्डर केली आहे. त्यामुळं आता एअर इंडिया ही Trent XWB-97 हे इंजिन बसवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. एअर इंडियाच्या विमानांच्या विकासासाठी हे इंजिन मोलाची भूमिका बजावेल. याद्वारे भारत आणि अमेरिकेदरम्यान अल्ट्रा-लाँग-रेंज मार्गांसाठी विश्वासार्हता, लवचिकता आणि कार्यक्षमता यावर भर देण्यात येणार असल्याचं रोल्स रॉयसनं म्हटलं आहे.

Rolls Royce_Air India
Maharashtra Politics: "ही फूट नाही तर पक्षांतर्गत मतभेद"; शिंदे गटाच्या वकिलांचा आक्रमक युक्तीवाद

ट्रेंट XWB एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी सर्वात टिकाऊ लांब पल्ल्याचा विमानोड्डाणाचा पर्याय मिळणार आहे. ट्रेंट इंजिनच्या पहिल्या पिढीच्या तुलनेत हे इंजिन 15 टक्के इंधन बचत करते तसेच आवाजाची पातळी कमी राखण्यास मदत करते, असंही कंपनीनं म्हटलं आहे.

Rolls Royce_Air India
Maharashtra Politics: "...तर ठाकरे गटाला याचिकाच मागे घ्यावी लागेल"; अॅड. साळवेंचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद

एअर इंडियाची ही ऑर्डर भारतातील हवाई प्रवासाची वाढत्या मागणीकडं लक्ष वेधून घेते. भारत ही आता जगातील तिसरी सर्वात मोठी एअरलाईन बाजारपेठ आहे आणि जागतिक स्तरावर पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारतातील हवाई प्रवासी वाहतूक दर वर्षी 6 टक्क्यांहून अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळं या उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी 400 पेक्षा जास्त मध्यम आणि मोठ्या विमानांची आवश्यकता असणार आहे. यामुळं भारत रोल्स-रॉईससाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची बाजारपेठ बनते, असंही रोल्स रॉयसनं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com