रॉयल एनफिल्डची Bullet 350 BS6 झाली महाग; जाणून घ्या नव्या किंमती

royal enfield
royal enfield


नवी दिल्ली: रॉयल एनफील्ड (Royal Enfield) या प्रसिध्द मोटारसायकल निर्मिती कंपनीने त्यांच्या स्वस्त असणाऱ्या मोटरसायकल सिरिजच्या किंमती वाढवल्या आहेत. ही बीएस 6 ( BS6) इंजिन असणारी रॉयल एनफील्ड  Bullet 350 मोटरसायकल आहे.  बीएस 6 इंजिनसह येणारी रॉयल एनफील्ड बुलेट 350 मोटरसायकल तीन प्रकारामध्ये येत आहे. ही बाइक एक्स, स्टँडर्ड ब्लॅक आणि ईएस (ES-electric start) मॉडेलमध्ये येत आहे.  त्यातील एक्स व्हेरियंट ही बुलेट सर्वात स्वस्त आहे.

आताची किंमत किती?
 रॉयल एनफील्ड बुलेट 350 च्या तिन्ही प्रकारांच्या एक्स-शोरूम किंमतीत 2,756 रुपयांनी वाढ झाली आहे. bikewaleच्या रिपोर्टनुसार दिल्लीतील रॉयल एनफील्ड बुलेट एक्स 350 (Bullet X 350) व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत आता 1 लाख 27 हजार 93 रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर रॉयल एनफील्ड (Black) ची एक्स-शोरूम किंमत आता वाढून 1 लाख 33 हजार 260  झाली आहे. तर इलेक्ट्रिक स्टार्टसह येणाऱ्या बुलेट एक्स 350 ईएस ( Bullet X350 ES) व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 42 हजार 705 रुपये झाली आहे. या किंमती जरी वाढल्या असल्या तरी बुलेटमध्ये कोणतेही बदल झालेला नाहीत. या वाढलेल्या किंमती कंपनीच्या वेबसाइटवर दिसत आहेत. 

या बाईकमध्ये 346 cc इंजिन आहे-
 बुलेट 350 हे रॉयल एनफील्डच्या मोटारसायकलीमधल्या सर्वाधिक खपला जाणार मॉडेल आहे. आता यात काही नवीन फॅशनेबल रंग पर्याय उपलब्ध आहेत. रॉयल एनफील्डने बुलेटचा सर्वात जुना अवतार कायम ठेवला आहे. त्याच्या इंधन टाकी आणि बाजूच्या पॅनेल्सवर काळ्या रंगासह सोनेरी पिनस्ट्रिप्स दिल्या आहेत. या बाईकमध्ये 346 ccचे सिंगल-सिलिंडर फ्यूल इंजेक्टेड इंजिन आहे, जे 19.1 बीएचपीची पॉवर आणि 28 Nm ची पीक टॉर्क निर्माण करते. विषेश म्हणजे या बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स आहे. 

रॉयल एनफील्ड ऑल-न्यू J प्लॅटफॉर्मवर आधारित बाइक्सची नवीन मालिका लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.  कंपनीच्या मालिकेतील Meteor 350 बाइक प्रथम मॉडेल असू शकते. रॉयल एनफील्डच्या या बाईकचे बरेच तपशील लीक झाले आहेत. ही बाईकला या महिन्याच्या अखेरीस लॉंच होऊ शकते.

(edited by- pramod sarawale)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com