esakal | रॉयल्टी, डिझेल, लोखंड दरवाढीने स्टोन, क्रशर उद्योग अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

stone crusher

रॉयल्टी, डिझेल, लोखंड दरवाढीने स्टोन, क्रशर उद्योग अडचणीत

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद: रॉयल्टी, डिझेल, लोखंड दरातील वाढीमुळे स्टोन क्रशर उद्योग अडचणीत आला आहे. आता यामध्ये भाववाढ करावी तसेच वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ जिल्हा स्टोन क्रशरधारक संघटनेने मंगळवारी (ता.२०) जुलै ते ३१ जुलै असे अकरा दिवस आपला उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष एस. डी. दौडे, सचिव कडुबाळ नरवडे यांनी दिली.

मागील काही वर्षापासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून दर ६० रुपयांवरुन १०० रुपयांच्या जवळपास गेला आहे. लोखंडाचे दर ४५ रुपये पासून ७५ रुपये प्रती किलोपर्यंत गेले आहे. या उद्योगाला लागणाऱ्या स्पेअर पार्टमध्ये ४० टक्‍क्यांची वाढ झाली आहे. यात भर म्हणून शासनाने रॉयल्टी दरात प्रती ब्रास २०० रुपये वाढ केली आहे. त्यावरील टॅक्स पकडून ही वाढ ३५० रुपये प्रती ब्रास इतकी होते. एकूण भाववाढ ४०० रुपयांवरुन ७५० रुपये इतकी झालेली आहे.

हेही वाचा: गुरुवारपासून मराठवाड्यातील १३२ आयटीआयचे वर्ग सुरू

या सर्व घटकांचा परिणाम आता स्टोन, क्रशरवर झाला आहे. अनेकांना कर्जाचे हप्ते भरणे अवघड जात आहे. त्यातच मागील दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे नुकसान झाले आहे. या परिस्थितून बाहेर येण्यासाठी शासनाने मदत करावी नसता भाववाढ करावी लागेल असे संघटनेचे म्हणने आहे.

loading image