esakal | गुरुवारपासून मराठवाड्यातील १३२ आयटीआयचे वर्ग सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

ITI

गुरुवारपासून मराठवाड्यातील १३२ आयटीआयचे वर्ग सुरू

sakal_logo
By
संदिप लांडगे

औरंगाबाद: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अंतर्गत येणारी राज्यातील शासकीय आणि खासगी अशा सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार मराठवाड्यातील १३२ आयटीआय येत्या गुरुवारपासून (ता.२२) कोरोना नियमांचे पालन करत सुरू होणार आहेत. मराठवाड्यात ८५ शासकीय आणि ५० खासगी असे एकूण १३२ आयटीआय आहेत. आयटीआय सुरू करण्यासाठी महाआरोग्य, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमअंतर्गत प्रशिक्षण संस्था सुरू करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, तसेच राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन केले जावे, यासाठी शारीरिक अंतर राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून प्रात्यक्षिक सत्र आयोजित केले जातील, याची दक्षता घेण्यात यावी असेही नमूद करण्यात आले आहे.

आयटीआयचे शिक्षण प्रामुख्याने प्रशिक्षणावर आधारित असते. कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून प्रशिक्षणार्थी ऑनलाइनद्वारे प्रशिक्षण घेत होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे अनेक संकल्पना ऑनलाइनद्वारे समजून सांगणे किंवा शिकवणे निदेशकांना शक्य होत नव्हते. मात्र, आता आयटीआयचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार असल्याने ऑनलाइन प्रशिक्षणातील त्रुटी दूर करता येणार असल्याचे औरंगाबाद शासकीय आयटीआयचे प्रा. अभिजित अल्टे यांनी सांगितले.

हेही वाचा: केसांवर फुगे नव्हे, मिळतात भांडी! बेरोजगारांना मिळतोय रोजगार

जिल्हा--------- एकूण संस्था

- औरंगाबाद-- १७
- बीड ------ २४
- हिंगोली ---- ७
- जालना ---- १२
- लातूर ----- १८
- नांदेड ----- २४
- परभणी --- १३
- उस्मानाबाद--- १७
------------
एकूण: १३२ ( शासकीयः ८५ - खासगी संस्था : ५०)

loading image