आता सहा हजार कोटींचा नवीन गैरव्यवहार

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

आता हिमाचल प्रदेशात सहा हजार कोटींचा नवीन गैरव्यवहार समोर आला आहे. हिमाचल प्रदेशातील इंडियन टेक्नोमॅक कंपनी लिमिटेडचे संचालक विनय कुमार शर्मा याला अटक करण्यात आली असून ते माजी आयएएस अधिकारी एम एल शर्मा यांचा मुलगा आहे.

सिमला : आता हिमाचल प्रदेशात सहा हजार कोटींचा नवीन गैरव्यवहार समोर आला आहे. हिमाचल प्रदेशातील इंडियन टेक्नोमॅक कंपनी लिमिटेडचे संचालक विनय कुमार शर्मा याला अटक करण्यात आली असून ते माजी आयएएस अधिकारी एम एल शर्मा यांचा मुलगा आहे. विनय अनेक दिवसांपासून फरारी होता. विनयच्या अटकेसाठी राज्यातील वेगवेगळ्या तपास यंत्रणा गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत होत्या. हिमाचलमधील जगतपूर गावातील पांवटा साहिब येथे कंपनीचे युनिट होते. विनयने  कंपनीच्या माध्यमातून कर्मचा-यांचा निर्वाह निधी (ईपीएफ), सेल्स टॅक्स, प्राप्तिकर भरले नव्हते. 

विनयला आता पांवटा साहिब येथील स्थानिक न्यायालयात हजर केले असून त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्यातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा गैरव्यवहार समजला जात असून  सीआयडी टीम सध्या मुख्य आरोपी कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक राकेश कुमार शर्मा याच्या शोधात आहे. शर्मा देश सोडून पळून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, मात्र सीआयडीकडे याबाबत खात्रीलायक माहिती नाही. 

पोलिसांकडे असलेल्या माहितीनुसार, एकूण सहा हजार कोटींचा हा गैरव्यवहार असून शर्माने कंपनीत  2175 कोटी 51 लाखांचा गैरव्यवहार केला आहे. शिवाय विविध बँकांकडून 2300 कोटी आणि प्राप्तिकर  विभागाचे 780 कोटी बुडवले . 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rs 6000 Cr. fraud unearthed in Himachal Pradesh