‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जुलै 2017

महसूल सचिव हसमुख अधिया यांचे ट्विटरवर आवाहन

नवी दिल्ली : "जीएसटी'संदर्भात सोशल मीडियावर येणारा मजकूर तथ्यहीन असून तो फॉरवर्ड करू नका, असे आवाहन महसूल सचिव हसमुख अधिया यांनी केले आहे. याबाबत अधिया यांनी ट्विट करून "जीएसटी'विषयीच्या शंकांचे निरसन केले.

क्रेडिट कार्डने बिले भरल्यास दोन वेळा जीएसटी भरावा लागत असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा मेसेज चुकीचा असून तो फॉरवर्ड करू नका. याबाबत संबंधित विभागाची चौकशी करावी, असे अधिया यांनी म्हटले आहे. "जीएसटी' क्रमांक मिळाला नसल्यास त्यासाठी प्रतीक्षा करू नका. तात्पुरत्या ओळखपत्रावरून उद्योग सुरू ठेवा आणि महिनाभरात "जीएसटीएन'साठी नोंदणी करा, असे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले आहे.

"जीएसटी'साठी ऑनलाइन पावतीच (इन्व्हॉइस) हवी, असे नाही. "जीएसटीएन' नोंदणी होईपर्यंत लेखी पावत्याही (मॅन्युअल इन्व्हॉइस) चालतील, असे अधिया यांनी म्हटले आहे. "जीएसटी' करप्रणालीसाठी दररोज इंटरनेट हवे, असा गैरसमज आहे. मात्र, महिनाअखेर "जीएसटी' रिटर्न सादर करताना इंटरनेटची गरज भासेल, असे अधिया यांनी म्हटले आहे. "जीएसटी'चा दर व्हॅटहून अधिक असल्याचा मेसेज फिरत आहे. मात्र, "जीएसटी'मध्ये उत्पादन शुल्क आणि इतर करांचा समावेश असल्याचे अधिया यांनी स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumor on social media about GST