Rupee Bank : उद्यापासून 'या' बँकेला लागणार टाळं; आजच पैसे काढून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rupee Bank : उद्यापासून 'या' बँकेला लागणार टाळं; आजच पैसे घ्या काढून

Rupee Bank : उद्यापासून 'या' बँकेला लागणार टाळं; आजच पैसे घ्या काढून

देशातील आणखी एका को-ऑपरेटिव्ह बँकेला उद्या टाळं लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पुण्यातील रुपी सहकारी बँक बंद करण्याचे आदेश दिलेत. उद्यापासून या बँकेच्या सर्व सेवा बंद होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचे पैसे बँकेतून काढावेत, अशी सूचना आरबीआयने दिली आहे. 22 सप्टेंबरनंतर ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत असंही आरबीआयने स्पष्ट केलं आहे. आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे रुपी सहकारी बँक बंद होत आहे.

आरबीआयने पुणेस्थित रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला. बँक उद्यापासून (22 सप्टेंबर) आपले सर्व व्यवहार बंद करत आहे. त्यामुळे पैसे काढण्यासाठी बँकेच्या ग्राहकांकडे केवळ आजचा दिवस शिल्लक आहे. यानंतर ग्राहकांना त्यांचे पैसे खात्यातून काढता येणार नाहीत. रुपी बँकेची आर्थिक स्थिती अतिशय वाईट असल्यामुळे आरबीआयने रुपी बँकेचा परवाना रद्द केला आहे.

रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेने आरबीआयच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं. यामुळे रुपी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. बँकेकडे पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्यामुळे आणि उत्पन्नाची शक्यता नसल्यामुळे आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे. याची माहिती आरबीआयने ऑगस्टमध्ये ग्राहकांना दिली होती. 10 ऑगस्टला यासंदर्भातली एक प्रेस रिलीज प्रसिद्ध करण्यात आली होती.

Web Title: Rupee Cooperative Bank Shut Banking Service Customers Will Not Be Able To Withdraw Money After On 22 September

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bankpune