डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला; सलग तीन सत्रांत 80 पैशांची वाढ 

पीटीआय
Thursday, 30 April 2020

डॉलरच्या तुलनेत रुपयात काल सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील तीन सत्रांत रुपया 80 पैशाने वधारला आहे. चलन बाजारात काल सकाळपासूनच रुपयाची सुरूवात सकारात्मक झाली.

मुंबई - देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी आणि जागतिक पातळीवर कमकुवत झालेला डॉलर यामुळे काल डॉलर वधारला. डॉलरच्या तुलनेत रुपयाने काल 52 पैशांची उसळी घेऊन 75.66 ही पातळी गाठली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉलरच्या तुलनेत रुपयात काल सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील तीन सत्रांत रुपया 80 पैशाने वधारला आहे. चलन बाजारात काल सकाळपासूनच रुपयाची सुरूवात सकारात्मक झाली. तो दिवसभरात 75.60 या उच्चांकी आणि 75.96 या नीचांकी पातळीवर घसरला होता. अखेर मागील सत्राच्या तुलनेत 52 पैशांनी वधारून रुपया 75.66 या पातळीवर बंद झाला. मंगळवार (ता.28) रुपया 76.18 या पातळीवर बंद झाला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

देशांतर्गत शेअर बाजारात सध्या तेजीचे वार असल्यामुळे रुपयाला चांगले बळ मिळत आहे. अनेक देश कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेले लॉकडाउन उठविण्याची घोषणा करीत असल्याने बाजारात उत्साहाचे वारे आहे. याचाही फायदा रुपयाला झाला, अशी माहिती चलन बाजार विश्‍लेषकांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupee rises on strong equities