रुपयाची उच्चांकी झेप

पीटीआय
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपयाने गुरुवारी ७७ पैशांची उसळी घेऊन तो ६९.८५ या पातळीवर बंद झाला. मागील तीन महिन्यांतील रुपयाची ही उच्चांकी पातळी आहे. 

निर्यातदारांकडून डॉलरची विक्री आणि खनिज तेलाच्या भावातील घसरण, यामुळे रुपया वधारला. चलन बाजारात आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ७०.१५ या पातळीवर गेला. नंतर तो आणखी वधारून ६९.८८ या पातळीवर पोचला. अखेर मागील सत्राच्या तुलनेत तो ७७ पैशांनी वधारून ६९.८५ या पातळीवर बंद झाला. याआधी २४ ऑगस्टला रुपया ७० च्या पातळीखाली बंद झाला होता. त्या वेळी रुपया ६९.९१ या पातळीवर बंद झाला होता. 

शेअर बाजारातील तेजीमुळे रुपयाला बळ मिळाले. रुपयात सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’चे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी आगामी काळात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याचे सूतोवाच केल्याने डॉलरला फटका बसला. जगभरातील प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरमध्ये आज घसरण नोंदविण्यात आली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावातील घसरण कायम आहे. खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरल १.०४ टक्‍क्‍याने कमी होऊन ५८.१५ डॉलरवर आला.

खनिज तेलाच्या भावातील घसरण भारतासाठी सकारात्मक असून, चलनवाढ आणि चालू खात्यावरील तूट कमी होण्यास मदत होईल.   
- ऋषभ मारू, संशोधक विश्‍लेषक, आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupees Increase