रशियन कंपनीची महाराष्ट्रात 6,800 कोटींची गुंतवणूक; हजारोंना मिळणार रोजगार!

वृत्तसंस्था
शनिवार, 27 जुलै 2019

मुंबई: रशियन स्टील कंपनी, नोवोलिपस्टेक स्टील (एनएलएमके) महाराष्ट्रात 6,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 2022 पर्यत दोन टप्प्यात नोवोलिपस्टेक ही गुंतवणूक करणार आहे. कंपनी महाराष्ट्रात आपला पहिलाच कारखाना सुरू करणार आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद जवळच्या शेंद्रा किंवा बिडकीन औद्योगिक वसाहतीत (दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) या प्रकल्पासाठी जागा देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार राज्यात कारखाना सुरू करण्यासाठी रशियन स्टील कंपनीला सर्व प्रकारचे सहकार्य देईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई: रशियन स्टील कंपनी, नोवोलिपस्टेक स्टील (एनएलएमके) महाराष्ट्रात 6,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 2022 पर्यत दोन टप्प्यात नोवोलिपस्टेक ही गुंतवणूक करणार आहे. कंपनी महाराष्ट्रात आपला पहिलाच कारखाना सुरू करणार आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद जवळच्या शेंद्रा किंवा बिडकीन औद्योगिक वसाहतीत (दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) या प्रकल्पासाठी जागा देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार राज्यात कारखाना सुरू करण्यासाठी रशियन स्टील कंपनीला सर्व प्रकारचे सहकार्य देईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. पहिल्या टप्प्यात 800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तर 2022 पासून दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार असून त्यात 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. 

रशियन कंपनीचे वरिष्ठ संचालक आणि मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी यासंदर्भातील बैठक झाली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्यांनी रशियन कंपनीला सर्व प्रकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले. नोवोलिपस्टेक जागतिक पातळीवर इलेक्ट्रिक पोलादाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मागील 30 वर्षात महाराष्ट्रातील वीजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक सब-स्टेशनची मागणीसुद्धा 30 पटींनी वाढली आहे. नोवोलिपस्टेक स्टील कंपनी वीजेच्या वापरासाठी आणि ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे विशिष्ट प्रकारचे पोलाद बनवते. सध्या नोवोलिपस्टेक राज्यातील 20 टक्के ट्रान्सफॉर्मर पोलाद पुरवते. प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशात अन्यत्रसुद्धा या पोलादाचा पुरवठा केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russian Steel Firm To Invest Rs. 6,800 Crore In Maharashtra By 2022