Covid 19 Impact: पुढील वर्षात 10 टक्क्यापर्यंत वाढणार NPA; रेटिंग एजन्सीचा अंदाज

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 25 November 2020

आता कोरोनाच्या संकंटानंतर भारतीय बँकांसाठी आणि देशातील अर्थव्यवस्थेसाठी एक वाईट बातमी आहे.

नवी दिल्ली: 2020 या वर्षात कोरोना महामारीनं चांगलाच गोंधळ माजवला आहे. या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अजूनही कोरोनाचा कहर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. कारण प्रतिदिन कोरोना रुग्णांचा आकडा उतरला होता तो आता पुन्हा वाढू लागला आहे. अशातच देशाचे अर्थचक्र मंदावत असल्याने चिंता वाढली आहे. लोकांकडे पैसे नसल्याने बाजारात पैसा खेळता राहू शकत नाहीये.

आता कोरोनाच्या संकंटानंतर भारतीय बँकांसाठी एक वाईट बातमी आहे. S&Pच्या मतानुसार, भारतीय बँकांचे एनपीएचे प्रमाण यावर्षी 10 ते 11 टक्क्यांनी वाढू शकणार आहे. याशिवाय येत्या 12 ते 18 महिन्यांत एनपीएचे प्रमाण 10 ते 11 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने देशातील व्यवसायांवर गंभीर परिणाम झाला आहे. तसेच लाखो लोक या काळात बेरोजगार झाले आहेत. याचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे दिसत आहे.

बँकांचा NPA किती होऊ शकतो-
रेटिंग एजन्सी S&P अंदाजानुसार भारतीय बँकांचे एनपीएचे प्रमाण 10 ते 11 टक्क्यांनी वाढू शकते. तसेच पुढील 12 ते 18 महिन्यांत एनपीएचे प्रमाण 10 ते 11 टक्क्यांनी वाढू शकते. याचबरोबर पुढील वर्षी भारतीय बँकांनी क्रेडिट कॉस्ट 2.2 ते 2.9 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जनुसार (S&P Global Ratings) कोरोनाच्या संकटामुळे आशिया-पॅसिफिक बँकांच्या एनपीएमध्ये 300 अब्ज डॉलर्सची वाढ होऊ शकते. तर चीनच्या एनपीएचे प्रमाण सुमारे दोन टक्क्यांनी आणि क्रेडिट कॉस्टचे प्रमाण एक टक्क्याने वाढेल असा अंदाज आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस बँकांचे कर्जाचे प्रमाण 8.5 टक्के होते, जे जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमधील सगळ्यात जास्त होते. बँकिंग क्षेत्रातील दोन वर्षांच्या संकटामुळे लक्षणीय वाढ झाली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: S and P predict that Indian Banks NPA will increase