ए एस राजीव बँक ऑफ महाराष्ट्रचे नवे व्यवस्थापकीय संचालक

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक ए एस राजीव यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आज (ता. 02) कार्यभार स्वीकारला आहे.

नवी दिल्ली- इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक ए एस राजीव यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आज (ता. 02) रोजी कार्यभार स्वीकारला आहे.
 
ए एस राजीव यांना सिंडिकेट बँक, विजया बँक आणि इंडियन बँक मधील सुमारे तीन दशके व्यावसायिक बँकिंगचा अनुभव आहे. चार्टर्ड अकाउंटंट असण्यासोबतच त्यांच्याकडे कॉर्पोरेट क्रेडिट, आंतरराष्ट्रीय बँकिंग, ट्रेझरी, जोखीम व्यवस्थापन, क्रेडिट देखरेख व पर्यवेक्षण, एनपीए व्यवस्थापन, नियोजन आणि विकास, मानव संसाधन, दक्षता, कॉर्पोरेट प्रशासन, तपासणी व लेखापरीक्षण, सायबर सुरक्षा, वित्त, खाती आणि कर यासह बँकिंगच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठा अनुभव आहे.
 
राजीव हे गणित पदवीधर असून सोबतच एफसीए, एमबीए, डीआयएसए आणि सीएआयआयबी पात्र आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A S Rajeev joining Bank of Maharashtra as Managing Director & CEO today