Tata Motorsची भन्नाट आयडिया; नवीन कारची 'सेफ्टी बबल'द्वारे विक्री

tata motors
tata motors

नवी दिल्ली: सध्या भारतासह जगभरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. यामुळे मास्क, सॅनिटायझर्स आणि सोशल डिस्टंन्स हे सध्या प्रत्येकाच्या आयुष्याची त्रयी बनली आहे. आपण बाजारात कोणतेही वस्तू आणली तरी ती वस्तू आपण सॅनिटाइज करून वापरतो. आता देशभरातील कार उत्पादक आणि विक्रेत्यांनी कोविडच्या काळात सुरक्षितता आणि खबरदारी घेण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. कोणत्याही वस्तू अथवा गाडी प्रत्यक्ष संपर्क न येता ती ग्राहकांपर्यंत कशी पोहचेल याचीही कंपन्या काळजी घेत आहेत.  

कोरोनापासून काळजी म्हणून टाटा मोटर्सने (Tata Motors) सुरक्षेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता टाटा मोटर्स ग्राहकांना नवीन कार पूर्णपणे सॅनिटाइज केलेली, प्लॅस्टीकने संपूर्ण आवरण असलेल्या स्वरुपात विकली जात आहे.  टाटा मोटर्सने याची काही उदाहरणे आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. यात ग्राहकांच्या ताब्यात देण्यापूर्वी गाडी प्लास्टिक 'सेफ्टी बबल'च्या (Safety Bubble) आत डिलिवरी दिली जात आहे.

टाटा मोटर्सने या उपक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आणि म्हटले की, शेअर करत असताना कॅप्शनमध्ये, 'या शिल्डमुळे आमच्या ग्राहकांना देत असल्याला नव्या गाड्यांचे जंतूंपासून संरक्षण होण्यास मदत होईल.'

जे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यामध्ये सेफ्टी बबलमध्ये नवीन Tata Tiago hatchback ठेवली आहे. टाटा मोटार्सने त्यांच्या या उपक्रमाच्या मागे ग्राहकांची सुरक्षितता महत्वाची असल्याचे सांगितले आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात कार उत्पादक कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आरोग्य आणि स्वच्छतेच्या विविध अॅक्सेसरीज लाँच केल्या होत्या. आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी कंपनीच्या सततच्या प्रयत्नांनुसार, कार मालकांना चांगली सुरक्षा देण्यासाठी या अॅक्सेसरीजची रचना करण्यात आली होती.

आपल्या गाड्यांची स्वच्छता करण्याबरोबरच ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी टाटा मोटर्सने इतर ही पावले उचलली आहेत. याआधी ऑगस्ट महिन्यात कारउत्पादककंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आरोग्य आणि स्वच्छतेच्या विविध अॅक्सेसरीज लाँच केल्या होत्या. आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी कंपनीच्या सततच्या प्रयत्नांनुसार, कार मालकांना अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्यासाठी या अॅक्सेसरीजची रचना करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com