सर्वांगीण गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवंय? 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

‘सकाळ मनी’ने आयोजित केलेल्या या उपक्रमात सहभागी झाल्यास गुंतवणूकदारांना व्यक्तिगतरीत्या मोफत मार्गदर्शन मिळेल.

पुणे - गुंतवणुकीच्या क्षेत्रात ‘मिस सेलिंग’ हा अत्यंत गंभीर प्रश्‍न असून, त्याला दररोज शेकडो नागरिक बळी पडत असल्याचे तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आले आहे. बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्यासाठी खास सल्लागार असतात. परंतु, सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार भेटेलच, असे नाही. म्हणूनच, त्यांच्या बाबतीत ‘मिस सेलिंग’च्या घटना जास्त प्रमाणात घडताना दिसतात. हीच सामाजिक गरज लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने ‘वेल्थ चेक-अप’चा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत ‘सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर’ (सीएफपी) असलेली तज्ज्ञ मंडळी आर्थिक नियोजनाबद्दल तसेच सर्वांगीण गुंतवणुकीबाबत वैयक्तिकरीत्या मार्गदर्शन करणार आहेत. अशा मार्गदर्शनासाठी ‘सीएफपीं’कडून एरवी किमान ५-१० हजार रुपयांपर्यंतचे सल्लाशुल्क आकारले जाते. मात्र, ‘सकाळ मनी’ने आयोजित केलेल्या या उपक्रमात सहभागी झाल्यास गुंतवणूकदारांना व्यक्तिगतरीत्या मोफत मार्गदर्शन मिळेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

करबचत करायचीय? मग ‘सकाळ मनी’ आहे ना..! 
मार्च महिनाजवळ आल्याने गुंतवणूकदारांची आता करबचतीसाठी लगबग सुरू झाली असेल. तुम्हालाही करबचत करायची आहे? मग ‘सकाळ मनी’ने करबचतीसाठी खास ‘ईएलएसएस कॅम्प’चे आयोजन केले आहे. हा कॅम्प २९ फेब्रुवारीला (शनिवारी) सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. त्यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ७४४७४५२३३६ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. नावनोंदणी केलेल्यांना यात उपक्रमात सहभागी होता येईल. गुंतवणूक करावयाची असल्यास गुंतवणूकदारांनी येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, छायाचित्र आणि चेकबुक सोबत बाळगावे.

‘वेल्थ चेक-अप’ कॅम्प प्रथमच कोथरूडमध्ये 
‘सकाळ मनी’चा हा उपक्रम २९ फेब्रुवारीला (शनिवारी) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत त्रिदल हॉल, झाला सोसायटी, मारुती मंदिराजवळ, कर्वे रस्ता, करिष्मा चौक, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यात सहभागी होऊन तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळविण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ७४४७४५०१२३ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. मिस्ड कॉल दिल्यानंतर मेसेजद्वारे एक लिंक प्राप्त होईल. त्यामध्ये माहिती भरल्यानंतर नोंदणी क्रमांक मिळेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Money will provide guidance to investment