1 किलो ग्रॅम चहाची विक्री तब्बल 75 हजार रुपयांना!

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 30 October 2020

सचिव बिहानी यांनी अधिकची माहिती देताना सांगितले की, या चहाला विक्रमी किंमतीत विष्ण टी कंपनीने खरेदी केलं आहे. आता ही कंपनी या चहाला त्यांच्या ई-कॉमर्स वेबसाइटवरद्वारे विक्री करणार आहे.

नवी दिल्ली: गुरुवारी गुवाहाटीच्या टी ऑक्शन सेंटरने (GTAC) मनोहारी गोल्ड स्पेशलिटी चहाला तब्बल 75 हजार रुपये प्रति किलो ग्रॅमला विक्री केली आहे. यावर्षीची स्पेशालिटी चहाची ही किंमत सर्वाधिक ठरल्याची माहिती आधिकाऱ्यांनी दिली आहे. एक वर्षाच्या गॅपनंतर जीटीएसीने मनोहारीचा चहा 75 हजारांपेक्षा जास्तीने विकला गेला आहे. गुवाहाटी टी ऑक्शन बायर्स एसोसिएशन (GTABA) सचिव दिनेश बिहानी यांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे.

खरेदी कुणी केली? 
सचिव बिहानी यांनी अधिकची माहिती देताना सांगितले की, या चहाला विक्रमी किंमतीत विष्ण टी कंपनीने खरेदी केलं आहे. आता ही कंपनी या चहाला त्यांच्या ई-कॉमर्स वेबसाइटवरद्वारे विक्री करणार आहे. पुढे बोलताना बिहानी यांनी सांगितले की कोरोना महामारीच्या काळात चहा बाजारपेठेसाठी हा खूप मोठा सकारात्मक संदेश आहे. मनोहरी टी स्टेटने या चहाच्या उत्पादनासाठी खास उपययोजना केल्या होत्या. 

Yahoo: याहू युजर्ससाठी वाईट बातमी, कंपनीने घेतला मोठा निर्णय

2019मध्ये 50 हजार रुपयाला विकला गेला होता हा चहा-
मागील वर्षी या चहाची विक्री 50 हजार रुपये प्रति किलोंनी झाली होती. आसामच्या चहाची विशेषतः संपुर्ण जगभर प्रसिध्द आहे. या चहाची चव, सुगंध आणि कलर खूपच मनमोहक असतो. भारतात सर्वात जास्त चहाचे उत्पादन आसाम राज्यातच होतं. 

Vivo Navratri Offer: विवो स्मार्टफोनच्या खरेदीवर भन्नाट ऑफर

मागील वर्षी गुवाहाटी टी ऑक्शनने चहाच्या विक्रीत एक मोठं रेकॉर्ड बनवलं होतं. बिहानी यांनी सांगितले की, Orthodox Golden Tip Tea हा चहा मागील वर्षी 75 हजार 501 रुपये प्रति किलोने विकला गेला होता. याशिवाय मनोहारी गोल्ड चहा मागील वर्षी 50 हजार प्रति किलोने विकला गेला होता.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sale of the Manohari gold specialty tea for Rs 75 thousand per kg