भारतात मंदी येतेय! त्याचं मुख्य लक्षण आहे...

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

मुंबई: मोठ्या कार्यक्रमांच्या किंवा घडामोडींच्या वेळी टीव्ही संचाची बाजारातील मागणी शिखरावर असते. मात्र यावर्षी आयसीसी क्रिकेड विश्वचषकाच्या काळातसुद्धा टीव्ही संचाचा खप मागील वर्षाच्या तुलनेत मंदावलेलाच आहे. हे देशाची अर्थव्यवस्था मंदावत असल्याचे लक्षण असल्याचे मत बजाज फिनसर्व्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी व्यक्त केले आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे व्यक्त केले आहे.

एनबीएफसी (नॉन बॅंकिंग फायनान्स कंपनी) क्षेत्रातील संकटामुळेचे ग्रामीण आणि छोट्या उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत नसून अर्थव्यवस्थेचे मंदावणे हेसुद्धा त्यामागचे एक कारण आहे. अगदी एचडीएफसी असो किंवा आमची कंपनी असो आमची वाढ मंदावली आहे कारण बाजारातील मागणी घटली आहे. याचा एनबीएफसीच्या चलन तरलतेच्या अभावाशी काहीही संबंध नाही. हे मागील काही तिमाहींपासून सुरू आहे. कारण अर्थव्यवस्था हळूहळू मंदावते आहे, असेही बजाज पुढे म्हणाले.

रिझर्व्ह बॅंकेला एनबीएफसींच्या संदर्भातील नियमांना आणखी कडक करावे लागेल. पण त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्येही वाढ करावी, त्या क्षेत्राला दिलासाही द्यावा. जर एखादी बॅंक आणि एखादी एनबीएफसी एकाच ग्राहकाला किंवा एखाद्या कंपनीला कर्ज देत असेल तर त्या कर्जांना एकाच पद्धतीने हाताळले गेले पाहिजे. व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने ते एक पाऊल असेल. मला आशा आहे की आरबीआय हा मुद्दा लक्षात घेऊन बॅंकांप्रमाणेच मोठ्या एनबीएफसींनासुद्धा रोकडची उपलब्धता करून साहाय्य केले पाहिजे. एनबीएफसींना चांगले मार्जिन असल्यामुळे त्या बाजारात आत्मविश्वास निर्माण करू शकतील. आणि तोच मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण सध्या थकित कर्ज नाही तर विश्वासातील घट हेच एनबीएफसी क्षेत्रासमोरील संकट आहे. एनबीएफसी क्षेत्र म्हणून आमचे म्हणणे आहे की मोठ्या आणि चांगल्या कामगिरी एनबीएफसी ज्या अनेक बॅंकांपेक्षा मोठ्या आहेत त्यांचा अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा वाटा आहे. अशा एनबीएफसींना इतर 10000 एनबीएफसीपेक्षा वेगळी वागणूक दिली गेली पाहिजे, असेही पुढे संजीव बजाज म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjeev Bajaj says lower TV sales during Cricket World Cup a signal of slowing economy