Santosh Kedari writes about money management Thematic FOF Easy investment mutual fund
Santosh Kedari writes about money management Thematic FOF Easy investment mutual fundinvestment

थीमॅटिक एफओएफ : सुलभ गुंतवणूक

गुंतवणूकदार अनेकदा सेक्टोरल अर्थात क्षेत्र-विशिष्ट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात.
Summary

गुंतवणूकदार अनेकदा सेक्टोरल अर्थात क्षेत्र-विशिष्ट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात.

- संतोष केदारी

गुंतवणूकदार अनेकदा सेक्टोरल अर्थात क्षेत्र-विशिष्ट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात. कारण अशा फंडांची परतावा क्षमताही विलक्षण असते. तथापि, सेक्टोरल फंड हे चक्रीय आवर्तनांशी संलग्न असल्यामुळे आणि त्यातून केव्हा बाहेर पडायचे हे लोकांना माहीत नसल्यामुळे बहुतांशांना त्यावर अपेक्षित कमाई करता येत नाही.

कोणत्याही कल्पना सांगायला जितक्या सोप्या तितक्या त्या अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न पाहता बऱ्याचदा अनेकांना कठीण जातात. जेव्हा सेक्टर किंवा थीमचे आवर्तन फिरते आणि त्या सेक्टर/थीमची रया जाऊन तिची चमकही लोप पावते, तेव्हा त्या क्षेत्रात/थीममध्ये पुन्हा नव्याने तेजीचे आवर्तन सुरू होण्यापूर्वी गुंतवणूकदारांना कदाचित बराच काळ अडकून राहावे लागण्याची शक्यता असते.

जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या सेक्टोरल फंडामध्ये गुंतवणूक करते तेव्हा विविधीकरणाच्या संधी संपुष्टात येऊन ही गुंतवणूक फक्त एका क्षेत्रापुरती मर्यादित असते. त्यामुळे ते क्षेत्र चांगली कामगिरी करत नसेल, तर अशा गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. परंतु थीमॅटिक अर्थात विषयाधारीत फंडामध्ये, विविधीकरणाची संधी तुलनेने चांगली आहे.

कारण यात थीम अर्थात विषय अथवा लाक्षणिक यशोगाथेत गुंतवणूक करते. ज्यामध्ये अनेक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर असू शकतात, मात्र ते सर्व शेअर हे एका विशिष्ट थीमअंतर्गत येतात. उदाहरणार्थ, फंडाची थीम ही निर्मिती क्षेत्र अर्थात मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर बांधकाम ते रसायने ते अभियांत्रिकी अशा विविध उद्योगांमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाईल.

सर्व कंपन्या किंवा क्षेत्रांमध्ये महासाथीचा प्रभाव हा वेगवेगळा राहिला आहे. एक यशस्वी थीमॅटिक गुंतवणूकदार हे प्रवाह आधीच ओळखून असतो. तथापि, हे सांगायला सोपे; पण पूर्ण करण्यास अवघड आहे. येथेच थीमॅटिक फंड ऑफ फंड्स (एफओएफ) उपयुक्त ठरू शकतात.

या ठिकाणी निधी व्यवस्थापकाला अर्थव्यवस्थेतील घडामोडींच्या आधारे अनेक क्षेत्रे किंवा थीम्सना आजमावण्याची व त्यामध्ये गुंतवणूक करण्याची मुभा असते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात गुंतवणूक केव्हा करावी किंवा बाहेर पडावे याबद्दल गुंतवणूकदाराला काळजी करण्याची गरज नाही. कारण येथील निधी व्यवस्थापक योग्य त्या समयी योग्य तो निर्णय घेऊन तो कृतीत आणतील.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल थीमॅटिक अॅडव्हांटेज फंड ऑफ फंड्‌स

youtube.com/watch?v=11z-quequwE

या श्रेणीत उपलब्ध पर्याय म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेंशियल थीमॅटिक अॅडव्हांटेज फंड ऑफ फंड्‌स (एफओएफ) होय.

‘एफओएफ’ची रचना पाहता, निधी व्यवस्थापक बाजारातील संधींच्या आधारे अनेक क्षेत्रे आणि थीम्सना आजमावून घेऊ शकतो. तसेच, जेव्हा पोर्टफोलिओ पुनर्संतुलित केला जातो, तेव्हा गुंतवणूकदारांना कोणत्याही कर प्रभावाचा सामना करावा लागत नाही. म्हणून, तुम्ही गुंतवणूकदार म्हणून सक्रिय व्यवस्थापन आवश्यक असल्याने, क्षेत्रीय किंवा थीमॅटिक गुंतवणुकीपासून दूर राहात असाल, तर या फंडाचा गुंतवणुकीसाठी जरूर विचार केला जाऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com