मोठी बातमी: रिलायन्स आणि सौदी अरॅमको येताय एकत्र!

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबांनी यांनी सौदी अरॅमकोशी  भागीदारी केल्याची मोठी घोषणा केली आहे.

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबांनी यांनी सौदी अरॅमकोशी  भागीदारी केल्याची मोठी घोषणा केली आहे. रिलायन्सच्या सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी सौदी अरॅमकोशी तेलाच्या क्षेत्रात भागीदारी केल्याचे सांगितले असून सौदी अरॅमको कंपनी रिलायन्समध्ये २० टक्के गुंतवणूक करणार आहे.  सौदी अरॅमको रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

ऑईल टू केमिकल व्यावसायात म्हणजेच सौदी अरॅमको आता रिलायन्सच्या ऑईल आणि केमिकल (ओ टू सी) व्यवसायात गुंतवणूक करणार आहे. सौदी अरॅमकोकडून रिलायन्समध्ये 5.25 लाख कोटींची गुंतवणूक केली जाईल. 'रिलायन्सच्या इतिहासातील सर्वात मोठी परकी गुंतवणूक असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. सौदी अरॅमको आणि रिलायन्समध्ये बऱ्याच कालावधीपासून यासाठी चर्चा सुरू होती. अखेर त्याला यश आले आहे. इंजनाचा दर्जा सुधरण्यासाठी आणि त्याची लाइफ वाढवण्यासाठी कंपनी 'ऑईल टू केमिकल' व्यावसायाच्या माध्यमातून ऑईलपासून सर्वोत्कृष्ट उत्पादने तयार करत आहे. कंपनी या व्यावसायापासून २.२ लाख करोड रूपयांची निर्यात करत आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम सुरू आहे. शिवाय सध्या अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ तात्पुरती असून ती लवकरच जाईल असेही अंबानी यांनी यावेळी सांगितले. रिलायन्स देशातील सर्वाधिक जीएसटी आणि प्राप्तिकर भरणारा उद्योग समुह असल्याचेही त्यांनी अभिमानाने सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saudi Aramco to acquire 20% stake in RIL's oil-to-chemical business