
व्हॉल्युंटरी प्रोव्हिडंट फंडमधूनही (VPF) वाचवू शकता टॅक्स! कसा ते वाचा ?
पगारदार व्यक्तीसाठी प्रॉव्हिडंट फंड (Provident fund) खूप उपयुक्त आहे. यामध्ये कर्मचारी दरमहा त्याच्या पगारातून (Salary)काही भाग गुंतवतो. त्याच वेळी, एम्प्लॉयरदेखील तेवढाच भाग कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करतो. पण, आणखी एक पर्याय आहे ज्यातून प्रॉव्हिडंट फंडमध्ये (EPF) दुहेरी लाभ घेतला जाऊ शकतो. व्हॉल्युंटरी प्रोव्हिडंट फंड (Voluntary Provident Fund, VPF) हा एक प्रकारचा प्रोव्हिडंट फंडच (Provident Fund) आहे. पण याच्या अटी, मर्यादा आणि अटी वेगळ्या आहेत.
हेही वाचा: EPFO! आत्मनिर्भर भारत योजनेत नोंदणी करा, जबरदस्त फायदे मिळावा
VPF मध्ये बेसिकचे 100% जमा करू शकता
प्रोव्हिडंट फंडमध्ये कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या (Basic Salary) 12-12 टक्के + डीए जमा केला जातो. ऍम्प्लॉयरच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जातो. जर कर्मचाऱ्याला त्याचा इनहँड पगार कमी ठेवून प्रोव्हिडंट फंडमध्ये (EPF) योगदान वाढवायचे असेल, तर या पर्यायाला व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड (VPF) म्हणतात. VPF मध्ये, कर्मचारी त्याच्या पगारातून 100% पर्यंत जमा करू शकतो.
हेही वाचा: घटस्फोटानंतर ७२ टक्के स्त्रिया ऑनलाईन डेटींगसाठी तयार ! सर्वेक्षणात स्पष्ट
VPF कसे काम करते?
व्हीपीएफचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याला त्याच्या कंपनीच्या एचआरशी संपर्क साधावा लागेल. कंपनीने VPF ची सुविधा दिल्यास, HR विभाग कंपनीच्या धोरणानुसार तुमची गुंतवणूक सुरू करेल. सामान्यतः व्हीपीएफ खाते कर्मचाऱ्याच्या सध्याच्या ईपीएफ खात्याशी जोडले जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, कर्मचार्यांचे व्हीपीएफ योगदान सुरू होईल. मात्र, ते आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सुरू करता येईल. VPF मध्ये जमा केलेले पैसे दरवर्षी वाढवले किंवा कमी केले जाऊ शकतात. दुसरीकडे, एम्प्लॉयर VPF अंतर्गत त्याचे योगदान वाढवण्यास बांधील नाही.
हेही वाचा: पगारातून PF कट होतोय? केंद्र सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट
VPF वर टॅक्स लागतो का?
VPF वर देखील कर्ज घेता येते. मुलांचे शिक्षण, गृहकर्ज, मुलांचे लग्न यांसारख्या खर्चासाठीही यातून कर्ज घेता येते. पण, नवीन नियमानुसार, जर EPF आणि VPF चे योगदान एका आर्थिक वर्षात 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर अतिरिक्त रकमेवर व्याज म्हणून मिळालेले उत्पन्न करपात्र असेल. म्हणजे जर तुम्ही वार्षिक 3 लाख रुपये जमा केले असतील, तर 50 हजारांवर मिळणारे व्याज तुमच्या टॅक्स स्लॅबच्या दराने कर आकारला जाईल.
हेही वाचा: लग्नानंतर PF नॉमिनेशनमध्ये पत्नीचे नाव हवेच, अन्यथा.. जाणून घ्या नियम
VPF चे फायदे?
- VPF खात्यावर EPF प्रमाणेच व्याज उपलब्ध आहे.
- VPF ला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ मिळतो.
- EPF प्रमाणे, VPF खात्यात केलेली गुंतवणूक देखील EEE कॅटेगरी अंतर्गत येते, म्हणजे त्यातील गुंतवणूक, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅचुरीटीवर मिळालेले पैसे पूर्णपणे करमुक्त असतात.
- VPF खात्याची माहिती EPFO वेबसाइटवर देखील पाहता येईल.
- पैसे काढण्यासाठी ऑनलाइन दावा केला जाऊ शकतो.
- EPF प्रमाणे, VPF खात्यामध्येही लॉक-इन पीरियड असतो, जो केवळ कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्ती किंवा राजीनामा (जे आधी असेल) यावर होतो.
- VPF खात्यातून अंशतः पैसे काढण्यासाठी खातेदाराने पाच वर्ष काम करणे आवश्यक आहे. नसल्यास, कर कापला जातो.
- व्हीपीएफची संपूर्ण रक्कम निवृत्तीनंतरच काढता येते.
- नोकरी बदलल्यावर EPF प्रमाणे VPF फंडही हस्तांतरित अर्थात ट्रान्सफर केला जाऊ शकतो.
Web Title: Save Tax From The Voluntary Provident Fund Read How Its Works
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..