
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय (SBI)आपल्यासाठी एक विशेष ऑफर घेऊन आली आहे.
परदेशात शिक्षण घेणं झालं सोप्प; SBI देतंय कमी दरात कर्ज
SBI Education Loan: परदेशात शिक्षण घेण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते, पण तिथे शिक्षण घेण्यासाठी मोठी रक्कम लागते. तुम्ही तुमच्या मुलांना परदेशात शिकवण्याचा विचार करत आहात पण पैशांची अडचण आहे, मग आता याचा विचार करु नका, कारण देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय (SBI)आपल्यासाठी एक विशेष ऑफर घेऊन आली आहे. यामध्ये तुम्हाला 7.50 लाख ते दीड कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाचा लाभ मिळतो. त्याबद्दल अधिक जाणून घेऊया. (Reuters)
हेही वाचा: SBI कडून मोठी ऑफर; गृहकर्ज घेणाऱ्यांना होणार बंपर फायदा
एसबीआय ग्लोबल ऍड-व्हेंटेज पॉलिसी
परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलांसाठी बँकेने शिक्षण कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेला बँकेने जागतिक ऍड-व्हेंटेज असे नाव दिले आहे. या योजनेअंतर्गत मुलांना परदेशात शिकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही पदवीधर पदवी (Graduate Degree),पदव्युत्तर पदवी (Post Graduate Degree),पदविका अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्रे (Diploma Course or Certificate)किंवा डॉक्टरेट अभ्यासक्रम (Doctorate Course)करू शकता.
हेही वाचा: Crop Loan: उस्मानाबाद जिल्ह्यात पीककर्जाचे अवघे २७ टक्के वाटप
कोणकोणत्या देशांमध्ये अर्ज करू शकता?
तुम्ही अमेरिका, यूके, जपान, युरोप, सिंगापूर, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड या देशांमध्ये अर्ज करू शकता.
कर्जाअंतर्गत किती रक्कम मिळेल?
या योजनेअंतर्गत तुम्हाला शिक्षण कर्ज म्हणून 7.50 लाख ते दीड कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. या कर्जावरील व्याजदर 8.65 टक्के ठेवण्यात आला आहे. तर मुलींना आणखी 0.50 टक्के सवलत मिळते.
हेही वाचा: 'SBI'च्या 6100 जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ
शिक्षण कर्जात याचाही समावेश असेल
प्रवासाचा खर्च, शिक्षण शुल्क (Tution Fees), ग्रंथालय (Library) आणि प्रयोगशाळेचा खर्च (Laboratory), परिक्षा शुल्क(Exam Fees), पुस्तके, प्रकल्प कार्य (Project Work),प्रबंध (thysis), अभ्यास दौरा (Study Tour) यांचाही समावेश असेल
कर्जा घेण्यासाठी अर्ज कसा करावा
दहावी, बारावी आणि पदवीच्या मार्कशीट आणि प्रवेश परीक्षेचा रिझल्ट द्यावा लागेल. तुमच्याकडे कॉलेज ऑफर लेटर, प्रवेश खर्च, शिष्यवृत्ती, फ्री-शिपबाबत संपूर्ण माहिती लागेल. पासपोर्ट आकाराचा फोटो, विद्यार्थी आणि पालकांचा फोटो, आधार कार्डची प्रत आणि पालकांचे सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट आवश्यक आहे.
हेही वाचा: SBI बँकेची मेगाभरती रद्द; परीक्षार्थींना फी मिळणार परत!
कर्ज कधी फेडायचे?
कर्ज घेतल्यानंतर सहा महिन्यांनी आपण कर्जाची रक्कम भरायला सुरुवात करू शकता. कर्ज घेतल्यानंतर 15 वर्षांपर्यंत त्याची परतफेड करू शकतो. त्यामुळेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी ही चांगली योजना ठरू शकते.
Web Title: Sbi Bank Is Offering Low Interest Rate Loans To Those Studying Abroad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..