सेबीने केला एसबीआय कार्ड्सचा आयपीओ मंजूर!

वृत्तसंस्था
Tuesday, 11 February 2020

एसबीआय कार्ड्स अॅण्ड पेमेंट सर्व्हिसेसमध्ये स्टेट बॅंकेचा 74 टक्के मालकी हिस्सा आहे, तर उर्वरित हिस्सा सीए रोव्हर होल्डिंग्सचा आहे.

मुंबई : एसबीआय कार्ड्स अॅण्ड पेमेंट सर्व्हिसेसच्या आयपीओला सेबीने तत्वत: परवानगी दिली आहे. एसबीआय कार्ड्स अॅण्ड पेमेंट सर्व्हिसेस ही देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाचीच सहाय्यक कंपनी आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयपीओच्या माध्यमातून कंपनी 5,500 ते 6,000 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. तर या आयपीओमुळे कंपनीचे बाजारमूल्य जवळपास 55,000 ते 60,000 कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

- खूशखबर ! या कंपनीत आहे २० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती

या आयपीओद्वारे एसबीआय कार्ड्स अॅण्ड पेमेंट सर्व्हिसेस एकूण 13,05,26,798 इक्विटी शेअरची विक्री करणार आहे. यातील 3,72,93,371 इक्विटी शेअरची विक्री एसबीआय तर 9,32,33,427 इक्विटी शेअरची विक्री सीए रोव्हर होल्डिंग्स करणार आहे.

- कर्मचाऱ्यांसोबतचा संघर्ष 'गुगल'च्या एचआरला भोवला; होणार पायउतार!

एसबीआय कार्ड्स अॅण्ड पेमेंट सर्व्हिसेसमध्ये स्टेट बॅंकेचा 74 टक्के मालकी हिस्सा आहे, तर उर्वरित हिस्सा सीए रोव्हर होल्डिंग्सचा आहे. सीए रोव्हर होल्डिंग्स ही कार्लाईल एशिया पार्टनर्सची सहाय्यक कंपनी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI Cards IPO gets SEBI nod