esakal | एसबीआय कार्ड्सला 83.5 कोटींचा नफा
sakal

बोलून बातमी शोधा

SBI-Card

एसबीआय कार्ड अँड पेमेंट सर्व्हिसेसला चौथ्या तिमाहीअखेर 83.5 कोटींचा नफा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात  66.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने 249 कोटी रुपयांचा नफा नोंदविला होता.

एसबीआय कार्ड्सला 83.5 कोटींचा नफा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

* चौथ्या तिमाहीअखेर 83.5 कोटींचा नफा
* कंपनीच्या महसुलात 21 टक्क्यांची वाढ
* महसूल वधारून 2 हजार 510 कोटी रुपयांवर

मुंबई - एसबीआय कार्ड अँड पेमेंट सर्व्हिसेसला चौथ्या तिमाहीअखेर 83.5 कोटींचा नफा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात  66.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने 249 कोटी रुपयांचा नफा नोंदविला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान कंपनीच्या महसुलात 21 टक्क्यांची वाढ झाली आहे. महसूल 2 हजार 076 कोटी रुपयांवरून वधारून 2 हजार 510 कोटी रुपयांवर  पोचला आहे. 

मार्च महिन्यात ‘एसबीआय कार्ड्स अ‍ॅण्ड पेमेंट सव्‍‌र्हिसेस’ने प्रारंभिक खुल्या भागविक्रीतून (आयपीओ) नऊ हजार  कोटी रुपयांचे भांडवल उभारले होते. आयपीओ 2 ते 5 मार्चदरम्यान खुला होता.  कंपनीने त्यासाठी 750 रुपये ते 755 रुपये किंमत पट्टा निश्चित केला होता.

लॉकडाऊनचा फटका;  रेल्वेची महसूलातील तूट जाणार एवढ्या कोटीवर

एसबीआय कार्ड अँड पेमेंट सर्व्हिसेसचा शेअर दिवसअखेर 3.62 टक्क्यांच्या घसरणीसह  553 रुपयांवर स्थिरावला.

loading image