लॉकडाऊनचा फटका;  रेल्वेची महसूलातील तूट जाणार एवढ्या कोटीवर

वृत्तसंस्था
Friday, 8 May 2020

लॉकडाऊनमुळे रेल्वेच्या महसुलातील तूट ९० हजार कोटी रुपयांपर्यंत गेली असल्याचा अंदाज आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना संपूर्ण जग लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्राला बसत असून याचा मोठा फटका रेल्वेला बसला आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वेच्या महसुलातील तूट ९० हजार कोटी रुपयांपर्यंत गेली असल्याचा अंदाज आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

२४ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा, रेल्वेने जारी केलेल्या अंदाजात २०२०-२१ मध्ये एकूण महसूल घसरून १.४८ लाख कोटी रुपयांवर येईल, असे म्हटले होते. यात महसुलातील ६३ हजार कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली होती. २०१९-२० मध्ये रेल्वेच्या महसुलात आधीच २८ हजार कोटींची तूट होती. अशा प्रकारे रेल्वेची एकूण महसुली तूट ९० हजार कोटी रुपयांवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्येक देशात वेगळी पद्धत; कोणत्या देशात कसे होतात कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार

अर्थसंकल्पात प्रवासी भाड्यापोटी रेल्वेला ६१ हजार कोटी रुपये मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तथापि, प्रत्यक्षातील उत्पन्न ३० हजार कोटींच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. महसुलातील तुटीमागील हे मुख्य कारण आहे. मालवाहतुकीपोटी मिळणारा महसूल अर्थसंकल्पात १,४७,००० कोटी रुपये गृहीत धरण्यात आला आहे. तथापि, त्यात सुमारे ३० टक्के घसरण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लॉकडाऊनमध्येही जिओची भरभराट; फेसबुक, सिल्वर लेक नंतर 'या' तिसऱ्या कंपनीची गुंतवणूक

दरम्यान, अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात २०२०-२१मध्ये रेल्वेचे एकूण उत्पन्न २.२५ लाख कोटी रुपये गृहीत धरण्यात आले होते. त्यावेळी महसुलातील तूट फक्त १०० कोटी रुपयांची होती. चालू वित्त वर्षात मिळणाऱ्या महसुलातून आपला खर्च भागविण्यास रेल्वे असमर्थ असल्याचे दिसून येत आहे, असे अहवालात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Railways staring at Rs 90000 crore shortfalls in earnings due to Lockdown