खुशखबर: स्टेट बँकेने केले कर्ज आणखी स्वस्त!

वृत्तसंस्था
Wednesday, 9 October 2019

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) कर्ज आणखी स्वस्त केले आहे. रिझर्व्ह बँकेकडून दर कपात करण्यात आल्यानंतर आता एसबीआयने एमसीएलआरचे दर 0.10 टक्क्यांनी कमी केले आहे. परिणामी कर्जदर आता कमी झाला आहे. रिझर्व्ह बँकेने सलग पाच वेळा रेपो दरात कपात केली आहे. तर स्टेट बँकेने आपल्या दरात सलग सहावेळा कर्जाच्या दरात कपात केली आहे. नवीन कमी केलेले दर उद्यापासून म्हणजेच  10 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येतील. 

स्टेट बँकेने आता एक वर्षासाठीचे एमसीएलआरचे दर 8.15 टक्क्यांवरून कमी करून 8.05 टक्क्यांवर आणले आहेत. त्यामुळे आता गृहकर्ज घेणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना फायदा मिळावा म्हणून बँकेने कर्जदरात कपात केली असल्याचे सांगितले आहे. 

स्टेट बँकेबरोबरच बँक ऑफ महाराष्ट्रने देखील कर्जदरात कपात केली आहे. बँकेने देखील एमसीएलआरचे दर 0.10 टक्क्यांनी कमी केले आहे. बँकेचा एक वर्ष एमसीएलआर 8.40 टक्के असून हा बाजारपेठेच्या सद्यस्थितीत अत्यंत स्पर्धात्मक व्याजदर आहे. इतर सर्व कालावधीतील म्हणजे ओव्हरनाईट, एक महिना, तीन महीने आणि सहा महिन्याचा व्याजदर अनुक्रमे 8.05 टक्के, 8.15 टक्के , 8.20 टक्के आणि 8.30 टक्के असा आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI cuts lending rates, home loans to get cheaper