esakal | खुशखबर! SBI चं होम लोन झालं स्वस्त

बोलून बातमी शोधा

home loans
खुशखबर! SBI चं होम लोन झालं स्वस्त
sakal_logo
By
नामदेव कुंभार

कोरोनाकाळात घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियानं (एसबीआय) होम लोनच्या (Home Loan) व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी एसबीआयनं एका जाहिरातीद्वारे ही घोषणा केली. आता एसबीआय बँकच्या होम लोनच्या व्याजदराची सुरुवात 6.70 टक्केंनी होणार आहे.

30 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनवरील व्याजाची सुरुवात 6.70% पासून असेल. 30 लाख ते 75 लाखांपर्यंतच्या होम लोनवरील 6.95% पासून व्याजाची सुरुवात असेल. त्याशिवाय 75 लाखांपेक्षा जास्त रुपयांच्या होमलोनवर 7.05 % व्याज आकारण्यात येईल. एसबीआयनं आपल्या जाहिरातीत म्हटलेय की, महिलांना पाच बीपीएस सूट मिळेल. महिला कर्जदारांना 0.05 टक्केंची विशेष सूट देण्यात येणार आहे.

हेही वाचा: SBI ग्राहकांनो क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पैसे स्विकारत असाल तर सावधान!

याशिवाय योनो अॅप (YONO App) यूजर्सलाही विशेष सूट देण्यात येणार आहे. SBI ने सांगितलं की, YONO app द्वारे होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना डिजिटल प्रोत्साहन देण्यासाठी 0.05 टक्केंची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.