esakal | शहनाज गिलने सिद्धार्थचा मृतदेह रुग्णालयात आणला - सूत्र
sakal

बोलून बातमी शोधा

शहनाज गिलने सिद्धार्थचा मृतदेह रुग्णालयात आणला - सूत्र

शहनाज गिलने सिद्धार्थचा मृतदेह रुग्णालयात आणला - सूत्र

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) गुरुवारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart attack) निधन झाले. तो अवघ्या ४० वर्षांचा होता. सिद्धार्थच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का (shocking death) बसला आहे. सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीने त्याची सर्वात जवळची मैत्रीण शहनाज गिल (Shehnaaz Gill) कोलमडून गेली आहे. या जोडीची मीडियामध्ये बरीच चर्चा होती. ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे सिद्धार्थचे झोपेत असतानाच निधन झाले.

त्याचा मृतदेह कुपर रुग्णालयात नेण्यात आला. त्यावेळी शहनाज गिल सुद्धा सिद्धार्थच्या कुटुंबीयांसोबत तिथे उपस्थित होती, असे सूत्रांनी सांगितले. सिद्धार्थ आणि शहनाजमध्ये खूपच चांगले मैत्रीसंबंध होते. बिग बॉस १३ नंतर दोघे डेटींग करत असल्याचीही चर्चा होती. सिद्धार्थ १३ व्या सीझनचा विजेता ठरला होता. चाहत्यांना या दोघांची जोडी आवडायची. चाहत्यांनी या जोडीला 'सीदनाझ' असे नाव सुद्धा दिले होते.

हेही वाचा: पोलिसांसमोर सिद्धार्थ शुक्लाच्या शव विच्छेदनाचं व्हीडीओ रेकॉर्डींग

सिद्धार्थच्या अकाली निधनाचा शहनाजला मोठा धक्का बसला आहे, असे तिच्या वडिलांनी सांगितले. गुरुवारी सकाळी शहनाज सिद्धार्थचा मृतदेह रुग्णालयात घेऊन आली. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. सिद्धार्थने झोपण्याआधी आदल्या रात्री काही औषधं घेतली होती. त्यानंतर तो उठलाच नाही, असे हॉस्पिटलमधील सूत्रांनी सांगितले.

loading image
go to top