निर्देशांकांची सलग दुसरी घसरण; ८७ अंश घसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sensex-&-Nifty

कोणत्याही अनुकूल संकेतांअभावी आज सेन्सेक्स व निफ्टी या भारतीय शेअर बाजार निर्देशांकांची घसरण झाली.

निर्देशांकांची सलग दुसरी घसरण; ८७ अंश घसरला

मुंबई - कोणत्याही अनुकूल संकेतांअभावी आज सेन्सेक्स व निफ्टी या भारतीय शेअर बाजार निर्देशांकांची घसरण झाली. सेन्सेक्स ८७.१२ अंश तर निफ्टी ३६.२५ अंश घसरला.

आज जागतिक शेअर बाजार मंद असल्यामुळे भारतीय बाजारही फार उसळी घेऊ शकले नाहीत. सकाळी व्यवहारांना सुरुवात होताना भारतीय शेअर बाजार स्थिर होते, नंतर त्यांच्यात मोठी घसरण झाली. मात्र शेवटच्या अर्धा तासात खरेदी झाल्यामुळे भाव बऱ्यापैकी सावरले, तरीही बाजार तोट्यातच बंद झाले. दिवसअखेर सेन्सेक्स ६१,६६३.४८ अंशावर तर निफ्टी १८,३०७.६५ अंशावर स्थिरावला.

आज निफ्टीच्या प्रमुख पन्नास पैकी ३५ शेअरचे भाव घसरले तर सेन्सेक्स मधील मुख्य ३० पैकी २० शेअरचे भाव घसरले. आता मोठ्या तेजीसाठी भारतातून कुठलेही संकेत मिळणार नसल्यामुळे परदेशी शेअर बाजारांकडे भारतीय गुंतवणुकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच अमेरिकी फेडरल बँकेच्या अध्यक्षांच्या आक्रमक विधानांमुळे सर्वजण धास्तावल्याची प्रतिक्रिया जाणकार देत आहेत. आज फक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर तेजित होते. तर वाहननिर्मिती कंपन्यांचे शेअर घसरले.

आज सेन्सेक्सच्या प्रमुख शेअर पैकी हिंदुस्तान लिव्हर, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, स्टेटबँक, कोटकबँक, इन्फोसिस, एचडीएफसी या शेअरचे भाव वाढले. मात्र ते एक टक्क्यापेक्षा कमीच वाढले. महिंद्र आणि महिंद्र अडीच टक्के तर मारुती दीड टक्के कोसळला. बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एअरटेल, अल्ट्राटेक, आयटीसी, विप्रो, बजाज फीनसर्व्ह, टायटन हे शेअर अर्धा ते दीड टक्के घसरले.

टॅग्स :NiftysensexDropped