निर्देशांक गडगडला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 जानेवारी 2019

मुंबई - अंतरिम अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा होण्याच्या शक्‍यतेने नफेखोरांनी सोमवारी बाजारात जोरदार नफावसुली केली. त्यामुळे सेन्सेक्‍समध्ये ३६८ अंशांची घसरण झाली आणि तो ३५ हजार ६५७ अंशांवर बंद झाला. निफ्टीत ११९ अंशांची घट झाली आणि तो १० हजार ६६१.५५ अंशांवर बंद झाला.

व्हिडिओकॉन कर्जप्रकरणी सीबीआयची कारवाई आणि एस्सेल समूहातील घडमोडींचा परिणाम आज बाजारावर जाणवला. वित्तसेवा क्षेत्रातील शेअर्सच्या विक्रीला गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिले. 

येस बॅंकेचा शेअर ५.४६ अंशांनी घसरला. त्याशिवाय बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बॅंक, इंडसइंड बॅंक आदी शेअर घसरणीसह बंद झाले. त्याशिवाय सन फार्मा, बजाज ऑटो, वेदांता, ॲक्‍सिस बॅंक, आयटीसी, टाटा स्टील, एचडीएफसी, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स, एसबीआय, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक, इन्फोसिसचे शेअर घसरणीसह बंद झाला. मात्र टीसीएस, कोल इंडिया, एलअँडटी, पॉवरग्रीड, एशियन पेंट्‌स शेअर तेजीसह बंद झाले.

सोने झळाळले
नवी दिल्ली - लग्नसराईचा हंगाम सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. दिल्लीत सोमवारी (ता.२८) सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला ३५० रुपयांनी वधारला आणि तो ३३ हजार ६५० रुपयांवर बंद झाला. मुंबईत सोने ३२५ रुपयांनी महागले आणि सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला ३२ हजार ८०० रुपयांवर बंद झाला. दिल्लीत चांदीच्या भावात तब्बल ८५० रुपयांची वाढ झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Colapse