शेअर बाजाराची घोडदौड थांबली, नोंदवली घसरण

पीटीआय
Thursday, 4 June 2020

सलग तीन दिवसांपासून सुरू असलेली शेअर बाजाराची घोडदौड आज थांबली आहे. शेअर बाजारात आज घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९३ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३१७ अंशांची घसरण सकाळच्या सत्रात दिसून आली.

सलग तीन दिवसांपासून सुरू असलेली शेअर बाजाराची घोडदौड आज थांबली आहे. शेअर बाजारात आज घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९३ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३१७ अंशांची घसरण सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३३,८०७ अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी ९,९६७ अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बॅंक, वित्तीय कंपन्यांच्या शेअरवर दबाव दिसून आला. मागील दोन दिवसांपासून या क्षेत्रातील शेअरच्या किंमतीत मोठी तेजी दिसून आली होती.

निफ्टी बॅंक निर्देशांकात जवळपास अडीच टक्क्यांची घसरण बाजार सुरू झाल्यानंतर नोंदवण्यात आली. इंडसइंड बॅंक, बजाज फायनान्स, अॅक्सिस बॅंक, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये जवळपास ४ टक्क्यांची घसरण झाली आहे. 

आर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या

काल शेअर बाजाराने मोठी तेजी नोंदवत सेन्सेक्सने ३४,००० अंशांची पातळी ओलांडली होती तर निफ्टीने १०,००० अंशांची पातळी ओलांडली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

'ही' कंपनी करणार कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्क्यांची वाढ

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये किंचित घसरण नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतील तेजीचा अटकाव झाला आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल २७६४ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात मात्र थोडी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ०.०६ रुपयांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया ७५.५२ रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.

भारतीय बॅंकांना आगामी काळात गरज २० ते ५० अब्ज डॉलरची

* सेन्सेक्स ३३,८०७ अंशांच्या पातळीवर
* निफ्टी ९,९६७ अंशांच्या पातळीवर 
* निफ्टीमध्ये ९३ अंशांची घसरण
* सेन्सेक्समध्ये ३१७ अंशांची घसरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex down by 300 points