शेअर बाजारात घसरण; मोदी लाट ओसरली?

वृत्तसंस्था
Tuesday, 21 May 2019

मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजाराने आज नवीन उच्चांक गाठले. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची नोंद केली. सकाळच्या सत्रात कामकाजाला सुरुवात होताच सेन्सेक्सने ऐतिहासिक 39 हजार 571 अंशांचा टप्पा गाठला. तर, दुसरीकडे निफ्टीने देखील 11 हजार 883 अंशांची ऐतिहासिक पातळी गाठली. 

मात्र शेअर बाजारात पुन्हा विक्रीचा मारा सुरु झाल्याने सेन्सेक्समध्ये 300 अंशांची तर निफ्टमध्ये 100 अंशांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स सध्या (दुपारी 2 वाजून 35 मिनिटे) 275.37 अंशांच्या घसरणीसह 39 हजार 077.30 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी 100.05 अंशांच्या घसरणीसह 11 हजार 728.20 पातळीवर व्यवहार करतो आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्स, अदानी पोर्ट, बीपीसीएल, आयओसी आणि झीचे शेअर प्रत्येकी 8.02 ते 2.66 टक्क्यांदरम्यान घसरले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex drops 240 points, Nifty at 11752