esakal | शेअर बाजारात मोठी घसरण;सेन्सेक्‍स ३८,०३४.१४, तर निफ्टी ११,२५०.५५ अंशांवर बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर बाजारात मोठी घसरण;सेन्सेक्‍स ३८,०३४.१४, तर निफ्टी ११,२५०.५५ अंशांवर बंद 

शेअर बाजारातही अडीच टक्‍क्‍यांपर्यंत मोठी घसरण झाली. सेन्सेक्‍स ८११.६८ अंशांनी घसरून ३८,०३४.१४ अंशांवर, तर निफ्टी २५४.४० अंशांनी घसरून ११,२५०.५५ अंशांवर बंद झाला. 

शेअर बाजारात मोठी घसरण;सेन्सेक्‍स ३८,०३४.१४, तर निफ्टी ११,२५०.५५ अंशांवर बंद 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या जागतिक भीतीमुळे सोमवारी (ता. २१) भारतीय शेअर बाजारातही अडीच टक्‍क्‍यांपर्यंत मोठी घसरण झाली. सेन्सेक्‍स ८११.६८ अंशांनी घसरून ३८,०३४.१४ अंशांवर, तर निफ्टी २५४.४० अंशांनी घसरून ११,२५०.५५ अंशांवर बंद झाला. 

शुक्रवारी रात्री अमेरिकी शेअर बाजार घसरण दाखवत बंद झाले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील निर्बंध कठोर करण्याचा इशारा दिल्यामुळे जागतिक अस्वस्थता होतीच. त्यातच युरोपात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता असल्याने त्यावर मात करण्यासाठी इंग्लंड, स्पेनसह अनेक देश पुन्हा लॉकडाऊन वा कठोर निर्बंध लादण्याच्या विचारात असल्याची बातमी आली. त्यामुळे आज इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स हे प्रमुख युरोपीय शेअर बाजार ३ टक्के घसरणीने उघडले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळी किंचित खालच्या दिशेने उघडलेले भारतीय बाजार तोपर्यंत स्थिर होते; पण युरोपातील घसरणीमुळे शेवटच्या दोन तासांमध्ये भारतीय बाजारांमध्येही तुफान विक्रीमुळे घसरण झाली. ही घसरण एवढी सर्वदूर होती की, मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकातील प्रमुख ३० समभागांपैकी फक्त कोटक बॅंक, इन्फोसिस, टीसीएस हे तीनच समभाग अर्धा ते पाऊण टक्के अशी किरकोळ वाढ दाखवत बंद झाले. अन्य २७ समभाग पाऊण ते साडेआठ टक्के घसरणीने बंद झाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोटक, इन्फोसिस, टीसीएसमध्ये वाढ 
कोटक बॅंक ११ रुपये वाढून १२८९ रुपयांवर बंद झाला. इन्फोसिस ६ रुपये वाढून १,००९ रुपयांवर, तर टीसीएस १३ रुपयांनी वाढून २,४६४ रुपयांवर बंद झाला. 

या कंपन्यांची झाली घसरण 
आज सर्वांत जास्त घसरण (८.६७ टक्के) इंडसइंड बॅंकेच्या समभागात झाली. तो ५३ रुपयांनी घसरून ५६० रुपयांवर बंद झाला. एअरटेल (बंद भाव ४६७ रु.), टाटा स्टील (३७३ रु.), मारुती (६,६२२), ऍक्‍सिस बॅंक (४२३), बजाज फायनान्स (३,३२७), सनफार्मा (५०३), आयटीसी (१७५), एचडीएफसी (१,७०८) यांचे दर घसरले. लार्सन अँड टुब्रो देखील ९०० रुपयांची पातळी खालच्या दिशेने तोडत ८८१ रुपयांवर बंद झाला. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा