शेअर बाजारात २१४ अंशांची वाढ 

वृत्तसंस्था
Friday, 21 August 2020

सेन्सेक्‍स ३८,४०० पातळीच्या खाली गेला नाही. एनटीपीसीचे शेअर १०५ रुपयांनी वाढले. एशियन पेंट्‌स ८३ रुपयांनी वाढून १,९५८ रुपयांवर बंद झाले. सन फार्माचे शेअर १० रुपयांनी वाढून ५३२ रुपयांवर बंद झाले.

मुंबई - जागतिक शेअर बाजारांमध्ये अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने आज मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारांच्या निर्देशांकात अर्धा टक्का वाढ झाली. सेन्सेक्‍स २१४.३३ अंशांनी वाढून ३८,४३४.७२ अंशावर, तर निफ्टी ५९.४० अंशांनी वाढून ११,३७१.६० अंशांवर बंद झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आज दिवसभर सेन्सेक्‍स ३८,४०० पातळीच्या खाली गेला नाही. एनटीपीसीचे शेअर १०५ रुपयांनी वाढले. एशियन पेंट्‌स ८३ रुपयांनी वाढून १,९५८ रुपयांवर बंद झाले. सन फार्माचे शेअर १० रुपयांनी वाढून ५३२ रुपयांवर बंद झाले. याशिवाय एचडीएफसी बॅंकेच्या शेअरमध्ये २७ रुपयांनी (बंद भाव १,०८५ रु.), तर नेस्ले इंडिया ३३८ रुपयांनी (१६,५५६ रु.) वाढला. भारती एअरटेल ५२० रुपयांपर्यंत तर टाटा स्टील ४२८ रुपयांपर्यंत घसरला. रिलायन्सही आज १४ रुपयांनी घसरून २,०८१ रुपयांवर स्थिरावला. लार्सन अँड टुब्रो, मारुती, इन्फोसीस, टीसीएस यांचे दर आज घसरले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex gained 214.33 points to close at 38,434.72