आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सची सलामी

वृत्तसंस्था
सोमवार, 1 एप्रिल 2019

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 39 हजार 028 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 11 हजार 700 ची पातळी ओलांडली आहे. सप्टेंबर 2018 नंतर प्रथमच निफ्टीने 11 हजार 700 अंशांची पातळी गाठली आहे.

क्षेत्रीय पातळीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँका(पीएसयू बँक), मेटल, ऑटो आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर मध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला आहे. परिणामी सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने वर्षभरातील उच्चांकी पातळी गाठली आहे.

मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, एचडीएफसी बँक आणि टीसीएस या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex goes high on first day of financial year