esakal | शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्स 'ऑल टाइम हाय'वर
sakal

बोलून बातमी शोधा

Sensex hits record high

शेअर बाजारात दिवाळीनंतर दिवाळी साजरी होताना दिसते आहे.

शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्स 'ऑल टाइम हाय'वर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई: शेअर बाजारात दिवाळीनंतर दिवाळी साजरी होताना दिसते आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक सेन्सेक्सने आज (सोमवार) 40,483.21 अंशांची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निदेशांक निफ्टी देखील 11,989.15 पातळीवर पोचला असून तो आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपासून थोडाच दूर आहे. मात्र निफ्टी फ्युचरने 12 हजार अंशांची पातळी गाठली. ही निफ्टीची 5 महिन्यातील उच्चांकी पातळी आहे. 

 सध्या सेन्सेक्स 91.25 अंशांच्या वाढीसह 40 हजार 256.28 अंशांवर तर निफ्टी45.95 अंशांनी वधारून 11 हजार 936.55 अंशांवर व्यवहार करतो आहे. दुपारच्या सत्रात ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. मात्र मेटल आणि टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी कायम होती. 

आज राष्ट्रीय शेअर बाजारात इन्फ्राटेल, जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील, इन्फोसिस आणि वेदांत लिमिटेडचे शेअर सर्वाधिक तेजीत आहे तर झी,आयओसी, मारुती, हिरोमोटो आणि हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.