सेन्सेक्‍सची आगेकूच कायम

वृत्तसंस्था
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

मुंबई - तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍सची आगेकूच कायम आहे. मंगळवारी (ता.३१) निर्देशांकात ११२.१८ अंशांची वाढ झाली आणि तो ३७ हजार ६०६ अंशांच्या नव्या उच्चांकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत सलग चौथ्या सत्रात वाढ झाली. दिवसअखेर निफ्टी ३६.९५ अंशांच्या वाढीसह ११ हजार ३५६ अंशांवर बंद झाला. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू असून, त्या पार्श्‍वभूमीवर व्याजदरांशी संबंधित शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले तसेच ब्लुचिप शेअर्सला मागणी दिसून आली. 

आशियातील नकारात्मक संकेतामुळे काही क्षेत्रात नफा वसुली दिसून आली. यामध्ये बॅंकांच्या शेअर्सला झळ बसली. एसबीआय, ॲक्‍सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक आदी शेअरमध्ये मोठी घसरण केली. दमदार तिमाही निकालांचा फायदा रिलायन्स इंडस्ट्रीजला झाला. रिलायन्सचा शेअर ३.१४ टक्‍क्‍यांच्या वाढीसह बंद झाला. या तेजीमुळे रिलायन्सने सर्वाधिक बाजार भांडवलाचा टप्पा गाठला आहे. हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्‌स, बजाज ऑटो, इन्फोसिस, सन फार्मा, मारुती सुझुकी, टाटा स्टील, भारती एअरटेल आदी शेअर तेजीसह बंद झाले. क्षेत्रीय पातळीवर ऊर्जा क्षेत्राच्या निर्देशांकात १.८९ टक्‍क्‍यांची वाढ झाली. रियल्टी १.०१ टक्के, कॅपिटल गुड्‌स ०.९५ टक्के, आयटी, एफएमसीजी, टेक आदी निर्देशांक वधारले. पीएसयू आणि बॅंकिंगमध्ये मात्र घसरण नोंदवण्यात आली. रिझर्व्ह बॅंक आणि फेडरल रिझर्व्हचे पतधोरणाचा बाजारावर दबाव असून, गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्‍लेषक विनोद नायर यांनी सांगितले.

रुपया वधारला
रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणाचा आज चलन बाजारावर प्रभाव दिसून आला. बाजारात आज डॉलरची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने त्याचा फायदा रुपया झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया १३ पैशांनी वधारून ६८.५४ वर बंद झाला. गेल्या दोन आठवड्यांतील रुपयाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sensex increase