सेन्सेक्‍समध्ये ११४ अंशांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज ११४ अंशांची उसळी घेत ३५,३७८.६० वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४२.६० अंशांची वाढ होत १०,७०० अंशांवर बंद झाला. व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक शेअर बाजारांमध्ये असलेली मरगळ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण होण्याच्या शक्‍यतेने आज शेअर बाजाराची सुरवात नकारात्मक झाली. फार्मा, आयटी, एफएमजीसी शेअरमध्ये तेजी दिसून आली. सिप्ला, सन फार्मा, बजाज फिनसर्व, मारुती सुझुकी, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले.

Web Title: sensex increase share market