सेन्सेक्‍स, निफ्टीची घसरगुंडी

पीटीआय
गुरुवार, 3 जानेवारी 2019

मुंबई - जागतिक पातळीवरील घसरणीचा फटका बुधवारी शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३६३ अंशांनी कोसळून ३५ हजार ८९१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात निफ्टी ११७ अंशांची घसरण होऊन १० हजार ७९२ अंशांवर बंद झाला. 

चीनच्या अर्थव्यवस्थेच्या निराशाजनक आकडेवारीमुळे जगभरातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. याचा फटका देशांतर्गत शेअर बाजाराला बसला. सेन्सेक्‍स आज ३६३ अंशांनी कोसळून ३५ हजार ८९१ अंशांवर बंद झाला. धातू आणि वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर आज विक्रीचा मोठा जोर होता. या दोन्ही क्षेत्रांतील कंपन्यांचे समभाग ३ टक्‍क्‍यांपर्यंत घसरले. 

उत्पादन क्षेत्राची वाढ मंदावली 
देशातील उत्पादन क्षेत्राची वाढ डिसेंबर महिन्यात मंदावली आहे. ‘निक्केई इंडिया मॅन्युफॅक्‍चिंरंग परचेसिंग मॅनेजर्स’ निर्देशांक डिसेंबरमध्ये ५३.२ वर आला आहे. नोव्हेंबर महिन्यात तो ५४ होता. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले. 

चीनच्या अर्थव्यवस्थेत घसरण 
चीनच्या आर्थिक विकासाचा वेग सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ६.५ टक्के या नीचांकी पातळीवर आला आहे. याचा फटका आज जगभरातील शेअर बाजारांना बसला.

Web Title: Sensex Nifty Decrease