शेअर बाजारात खरेदीचे वारे; बँकिंग क्षेत्र आघाडीवर

वृत्तसंस्था
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मुंबई: रिझर्व्ह बँकेमध्ये आलेले नवे गव्हर्नर बँकिंग क्षेत्रासाठी लाभदायक ठरतील या आशेने बँकिंग आणि एनबीएफसी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सोबतच ऑटो क्षेत्रात आलेल्या तेजीने भारतीय शेअर बाजाराने चांगलीच उसळी मारली आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स 400 अंशांनी तर, राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक 120 अंशांनी वधारला आहे. सध्या सेन्सेक्स 341.65 अंशांनी वधारला असून तो 35 हजार 491.66 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी 104 अंशांची वाढ झाली आहे. तो सध्या 10 हजार 652.10 अंशांवर व्यवहार करतो आहे. 

प्रामुख्याने, बँकिंग क्षेत्रातील खासगी आणि सर्वाजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स तेजीत आहेत. प्रामुख्याने, येस बँक, कोटक बँक सहित एसबीआय, पीएनबी इत्यादी बँकांची कामगिरी लक्षवेधक आहे. तर, एनबीएफसी कंपन्या डीएचएफएल, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्ससारखे शेअर्स सकारात्मक व्यवहार करत आहेत. 

उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याने बाजारातील रोखता वाढेल, पीसीए फ्रेमवर्कमध्ये सकारात्मक बदल, बँकांमध्ये प्रमोटरचा हिस्सा कमी करण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणि अधिक चांगले आर्थिक धोरण येईल या शक्यतेने बाजारात तेजी आल्याचे मत कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने म्हटले आहे 

अमेरिका आणि चीन या दोन देशांदरम्यान पुन्हा बातचीत सुरु झाल्याने अमेरिकी शेअर बाजारबरोबरच आशियाई शेअर बाजार देखील सकारात्मक व्यवहार सुरु आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex, Nifty Extend Gains; PSU Bank Index Rises