esakal | शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण; जाणून घ्या तीन मोठे आकडे
sakal

बोलून बातमी शोधा

sensex nifty historical down know three important numbers information marathi

सकाळच्या टप्प्यात निफ्टीचीही 326.50 अशांनी घसरण झाली होती. निफ्टी 10 हजार 662.95 अशांवर होता.

शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण; जाणून घ्या तीन मोठे आकडे

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : जागतिक बाजारातील तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम आज, शेअर बजारात दिसला. दुपारी एकच्या सुमारास मुंबई शेअर निर्देशांक 2 हजार 345ने घसरला तर, निफ्टीध्ये 638 पॉइंट्सची घसरण झाली आहे. या वर्षीची गेल्या दोन महिन्यांत मुंबई शेअर निर्देशांक 6 हजार 075 अशांनी घसरला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण
आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजर 1 हजार 152.35 अशांनी घसरण होऊनच सुरू झाला. त्यामुळं बाजारात सकाळपासूनच निरुत्साह दिसत होता. सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असल्यामुळं जगभरातील शेअर बाजारांवर परिणाम होत आहे. चीनवर अवलंबून असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होताना दिसत आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही होत आहे. त्याचबरोबर येस बँकेच्या घडामोडींमुळेही त्याच्या शेअर्समध्ये गेल्या शुक्रवारी मोठी घसरण झाली होती. सध्या बँकेचा शेअर 19.30 रुपयांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे, येस बँकेच्या शेअर्सच्या किमतीत 17.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आर्थिक क्षेत्रातील घडामोडींसाठी येथे ► क्लिक करा

कच्च्या तेलाने केला घोळ!
सकाळच्या टप्प्यात निफ्टीचीही 326.50 अशांनी घसरण झाली होती. निफ्टी 10 हजार 662.95 अशांवर होता. दुपारी बारा वाजता बाजार 1 हजार 463 अंशांनी घसरून, 36 हजार 112.86 अशांवर पोहोचला होता. ही घसरण साधारण 3 टक्क्यांपेक्षा जास्त होती. तर निफ्टी 404.45 अंशांनी घसरून 10 हजार 580 अंशांवर होता. बाजारात ऑगस्ट 2015नंतरचा हा सगळ्यांत वाईट दिवस आहे. मुळात कोरोनाचा प्रभाव बाजारावर दिसत असतानाच, कच्च्या तेलाच्या किमती 30 टक्क्यांनी घसरल्या. आंतरराष्ट्रीय बाजारातील ही सर्वांत मोठी घडामोड असल्यामुळं बाजारातील गुंतवणूकदार घाबरले आणि त्यांनी गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली. 

आर्थिक क्षेत्रातील घडामोडींसाठी येथे ► क्लिक करा

बाजार कोसळण्याचा पाच मोठ्या घटना

दिवस घसरण (अंशांत) कारण
09 मार्च 2020 2 हजार 345 कोरोना आणि तेलाच्या किमतींत घसरण
24 ऑगस्ट 2015 1 हजार 624 जागतिक बाजार कोसळला, रुपयाची घसरण
21 जानेवारी 2008 1 हजार 408 जागतिक बाजारातील घडामोडी 
24 ऑक्टोबर 2008 1 हजार 70 अमेरिकेतील बँका दिवाळखोरीत
1 फेब्रुवारी 2020 987 केंद्रीय अर्थसंकल्पातून अपेक्षाभंग