पाऊले चालती 'उच्चांकी' वाट ; सेन्सेक्स, निफ्टीचा नवा विक्रम 

पाऊले चालती 'उच्चांकी' वाट ; सेन्सेक्स, निफ्टीचा नवा विक्रम 

मुंबई: देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने सकाळच्या सत्रात नवीन उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे. सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात तब्बल 400 अंकांची उसळी घेत 38,652 अंशांची नोंद केली. तर, निफ्टी देखील 115 च्या वाढीसह 11,671 या सर्वोच्च पातळीवर पोचला. 

जागतिक बाजारांतील सकारात्मक संकेत आणि कन्झ्युमर कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदीचा ओघ सुरु झाल्याने शेअर बाजार वधारला  आहे. बँकिंग, धातू आणि एफएमसीजी सेक्टर मधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजारातील सर्वच निर्देशांक सकारात्मक आहेत. 

लार्ज कॅप आणि मिडकॅपसह स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स देखील वधारले आहेत. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.85 टक्क्यांनी वधारून 16,700 च्या पातळीवर तर, निफ्टीचा मिड कॅप 100 निर्देशांक 1.09 टक्क्यांनी वधारून 19754 वर व्यवहार करत आहे. बीएसईचा स्मॉल कॅप निर्देशांक 0.80 टक्क्यांनी वधारला आहे. 

आज मुंबई शेअर बाजारात रिलायन्स, वेदांता, ओेएनजीसी, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, येस बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, मारुती सुझुकी, स्टेट बँक, आयटीसी या प्रमुख कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आहे. 

शेअर बाजारात वाढ का?
अमेरिकी मध्यवर्ती बँक 'फेडरल रिझर्व्ह'चे अध्यक्ष जेरॉम पॉवेल आणि राष्ट्राध्यक्ष यांच्यात व्याज दरवाढीवरून जाहीर शाब्दिक चकमक झाल्यानंतरदेखील व्याजदरात आवश्यकतेनुसार वाढ केली जाईल या पॉवेल यांच्या विधानानंतर अमेरिकी शेअर बाजार शेवटच्या सत्रात वधारताना दिसला. त्याचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात देखील सकारात्मक वातावरण पहायला मिळत आहे. आशियाई बाजारात हॉंगकॉंग,शांघाई कोपॉझिट इंडेक्स आणि जपानच्या 'निक्केई' शेअर बाजार देखील वधारले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com