सेन्सेक्‍स, निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या सत्रात वाढ 

पीटीआय
Thursday, 30 April 2020

शेअर बाजारातील तेजीची मालिका बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात सुरूच राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 606 अंशांनी वधारून 32 हजार 720 अंशांवर बंद झाला. 

मुंबई - शेअर बाजारातील तेजीची मालिका बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात सुरूच राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 606 अंशांनी वधारून 32 हजार 720 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 172 अंशांच्या वाढीसह 9 हजार 553 अंशांवर स्थिरावला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत कंपन्यांचे लागलेले सकारात्मक निकाल, व्होडाफोन आयडिया आणि इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सला न्यायालयाकडून मिळालेला दिलासा आणि ऊर्जा क्षेत्राला सरकारकडून आर्थिक मदत जाहीर होण्याची अपेक्षा यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आज उत्साहाचे वातावरण होते. दुसरीकडे परकी गुंतवणूकदारांकडून भांडवली बाजारातील गुंतवणूक काढून घेण्याचे प्रमाणही कमी झाले असल्याने शेअर बाजारात तेजी कायम आहे. क्षेत्रनिहाय पातळीवर धातू, वित्तीय सेवा, माध्यमे, माहिती तंत्रज्ञान आणि बॅंकिंग निर्देशांक सर्वाधिक वधारले होते. एफएमसीजी आणि औषधनिर्माण निर्देशांकात मात्र, घसरण नोंदविली गेली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सेन्सेक्‍सच्या मंचावर आज एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, एचसीएलटेक, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील आणि एसबीआयचे समभाग सर्वाधिक वधारले. दुसरीकडे अँक्‍सिस बॅंक, एशियन पेंट्‌स, हिंदुस्थान युनिलिव्हर , टायटन आणि नेस्लेच्या समभागामध्ये घसरण नोंदविण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex, Nifty rises for third straight session