सेन्सेक्स पहिल्यांदाच ५६ हजार पार; गुंतवणूकदार मालामाल

Mumbai
MumbaiSakal
Updated on

‘सेन्सेक्स-निफ्टी’चे नवीन शिखर!

भारतीय शेअर बाजाराने आज तुफानी उसळी घेत नवीन सर्वकालिक उच्चांक नोंदवला आहे. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 56 हजारांचा टप्पा पार केला आहे. बुधवारी बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्सने 270 अंकाची उसळी घेतली. सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीने देखील 80 अंकांची वाढ नोंदवत 16 हजारांचा टप्पा पार केला आहे. बुधवारी सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्सने 0.43 टक्क्यांनी वधारला तर निफ्टी 0.39 टक्क्यांनी वाढला.

कोरोना संकटानंतर देशाची आर्थिक स्थिती पूर्ववत येण्याची चिन्हे दिसत असल्याने, तसेच प्रमुख कंपन्यांचे या तिमाहीचे निकाल चांगले येत असल्यामुळे आज गुंतवणुकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे दोनही भारतीय निर्देशांक मोठी वाढ पाहायला मिळाली. अर्थ क्षेत्रातील अभ्यासकांच्या मते, आठ महिन्यानंतर आरबीआयने मंगळवारी HDFC बँकेला पुन्हा क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करुन दिली, त्यामुळे आज बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आले.

Mumbai
उद्धव ठाकरे टॉप पाचमध्ये, पहिल्या 11 मध्ये भाजपचे दोन मुख्यमंत्री

शेअर बाजारने आजच्या व्यवसायाच्या सुरूवातीला आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. सेन्सेक पहिल्यांदाच 56 हजारांच्या पार पोहचला तर निफ्टीही 16 हजारांच्या पुढे गेला होता. आज HDFC मुळे शेअर मार्केटमध्ये सकारात्मक वातावरण होते. एचडीएफसीपाठोपाठ अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, पॉवर ग्रीड यांच्या शेअर्सनीही चांगली कमाई केली. तर इन्फोसिस, टाटा स्टील इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सला फटका सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com