शेअर बाजाराचाही जोश 'All Time High' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मे 2019

मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा विद्यमान सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजारात मोठे चैतन्य संचारले आहे. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची नोंद केली. सकाळच्या सत्रात कामकाजाला सुरुवात होताच सेन्सेक्सने ऐतिहासिक 39 हजार 571 अंशांचा टप्पा गाठला. तर, दुसरीकडे निफ्टीने देखील 11 हजार 883 अंशांची ऐतिहासिक पातळी गाठली. 

सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 92.99 अंशांनी वधारून 39 हजार 445.66 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी 11 हजार 839.40 आहे. त्यात 11 अंशांची वाढ झाली आहे. 

येत्या 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या प्रत्यक्ष निकालांमध्ये देखील बहुमताचा हा ट्रेंड कायम राहिला तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात मोठी तेजी येण्याची शक्यता जेपी मॉर्गनसहित इतरही काही ब्रोकिंग संस्थांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, विद्यमान मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यास स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी रॅली येण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex, Nifty Trade Near Record