सेन्सेक्स तेजीत; निफ्टी 9050 अंशांच्या पार

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई: काल दिवसभरातील मजबूत व्यवहारानंतर आज(बुधवार) शेअर बाजाराची सुरुवात तुलनेत सपाट झाली आहे. गुंतवणूकदारांचे आता फेडरल रिझर्व्हच्या आजपासून सुरु होणाऱ्या दोन दिवसीय बैठकीकडे लक्ष लागले आहे. सध्या(सकाळी 10 वाजता) सेन्सेक्स 42.67 अंशांच्या वाढीसह 29,485.30 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 9,097.75 पातळीवर व्यवहार करत असून 10.75 अंशांनी वधारला आहे.

बाजारात आयटी, कॅपिटल गूड्स क्षेत्रात दबाव निर्माण झाला आहे. आयटी क्षेत्रात एक टक्क्यापर्यंत घसरण झाली असून कॅपिटल गूड्स क्षेत्रात किरकोळ घसरण झाली आहे. याऊलट, बँकिंग, ऑटो, एफएमसीजी आणि हेल्थकेअर क्षेत्रात सकारात्मक व्यवहार सुरु आहे.

निफ्टीवर आयडिया सेल्युलर, अरबिंदो फार्मा, बँक ऑफ बडोदा, अदानी पोर्ट्स आणि रिलायन्सचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर टीसीएस, इन्फोसिस, भारती एअरटेल, एचसीएल टेक आणि एचयुएलचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sensex up now