esakal | सेन्सेक्सची 995 अंशांची झेप
sakal

बोलून बातमी शोधा

sensex

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 286 अंशांची वाढ झाली. तो 9 हजार 315 अंशांवर स्थिरावला. बुधवारी आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदार दोन लाख कोटींनी मालामाल झाले आहेत.  

सेन्सेक्सची 995 अंशांची झेप

sakal_logo
By
पीटीआय

मुंबई - जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतामुळे भारतीय शेअर बाजारात बुधवारी तेजीचे वातावरण होते. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 995 अंशांनी वधारून 31 हजार 605 अंशांवर स्थिरावला. तर  राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 286 अंशांची वाढ झाली. तो 9 हजार 315 अंशांवर स्थिरावला. बुधवारी आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदार दोन लाख कोटींनी मालामाल झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थांना सावरण्यासाठी चीन आणि जपानमधील केंद्रीय बँकांनी केलेल्या उपायोजनांमुळे आशियाई बाजारांमध्ये तेजीचे वातावरण होते. चीनची मध्यवर्ती बँक असलेल्या दि पीपल्स बँक ऑफ चायनाने चिनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी 120 अब्ज युआनची मदतीची घोषणा केली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

भारतीय शेअर बाजारात सकाळपासूनच गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह होता. क्षेत्रीय पातळीवर बँका, वित्त संस्था, ऑटो, रिअल्टी, हेल्थकेअर  कंपन्यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी होती. बँकिंग निर्देशांक सर्वाधिक 7.3  टक्क्यांची वधारला होता.  ऍक्सिस बँक 14 टक्के, आयसीआयसीआय बँक 10 टक्के आणि एचडीएफसी बँक 6 टक्क्यांनी वधारले. तर, पॉवरग्रीड, मारुती, एशियन पेंट्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट आणि सन फार्माच्या शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्सच्या मंचावर आघाडीच्या 30 कंपन्यांपैकी 24 कंपन्यांचे शेअर वधारून बंद झाले.