सेन्सेक्‍स पुन्हा ३९ हजारांवर

पीटीआय
गुरुवार, 25 एप्रिल 2019

खनिज तेलाच्या भावात घसरण
अमेरिकी शेअर बाजारातील तेजी आणि जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेली घसरण याचा फायदा देशांतर्गत शेअर बाजाराला झाला. खनिज तेलाचा भाव आज घसरण होऊन प्रतिबॅरल ७४.४५ डॉलरवर आला. अमेरिकेतील एस अँड पी आणि नॅसडॅक निर्देशांक काल (ता. २३) उच्चांकी पातळीवर बंद झाले होते. आशियाई बाजारांमध्ये आज घसरणीचे वातावरण दिसून आले.

मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे अखेर बुधवारी चौथ्या सत्रात संपुष्टात येऊन तेजी अवतरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४८९ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ५४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५० अंशांची वाढ होऊन ११ हजार ७२६ अंशांवर बंद झाला.

सेन्सेक्‍समध्ये आज एचसीएल टेक आणि ओएनजीसी यांच्या समभागात सर्वाधिक ३.४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली. त्याखालोखाल इंडसइंड बॅंक, येस बॅंक, भारती एअरटेल, एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, आरआयएल, बजाज फायनान्स, एसबीआय, टीसीएस, इन्फोसिस, आयसीआयसीआय  बॅंक यांच्या समभागात २.७५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली.

याचवेळी टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, पॉवर ग्रीड, मारुती, ॲक्‍सिस बॅंक आणि एनटीपीसी यांच्या समभागात ३.३३ टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. दरम्यान, शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, काल (ता. २३) परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २३७ कोटी रुपयांचे समभाग विकले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १९८ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Share Market