esakal | Share market: सेन्सेक्स तब्बल 1065 अंशांनी कोसळला
sakal

बोलून बातमी शोधा

sensex slumps

देशातील भांडवली बाजाराला आज मोठा ब्रेक बसला आहे. आज भांडवली बाजारात अचानक मोठी घसरण झाली आहे.

Share market: सेन्सेक्स तब्बल 1065 अंशांनी कोसळला

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: देशातील भांडवली बाजाराला आज मोठा ब्रेक बसला आहे. आज भांडवली बाजारात अचानक मोठी घसरण झाली आहे. युरोपमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्याची स्थिती झाली आहे. फ्रान्समध्ये शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याचा फटका भारतीय भांडवली बाजाराला बसल्याचे अर्थतज्ज्ञांनी सांगितले आहे. 

गुरुवारी सेन्सेक्समध्ये तब्बल 1065 अंशांची घसरण झाली आहे. सध्या या घसरणीमुळे सेन्सेक्स 39,728 पर्यंत घसरला आहे. तर निफ्टीतही 291 अंशांची घसरण होऊन 11,680 वर बंद झाला आहे. ही घसरण मागील काही आठवड्यांतील सर्वाधिक मोठी घसरण आहे.  

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मागील आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, TCS चे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढताना दिसले होते. दुपारी रिलायन्ससह औषध कंपन्यांची शेअर्सची जोरदार विक्री झाल्यानंतर सेन्सेक्स  1065   अंकांनी घसरला. निफ्टीही 291 अंकांच्या खाली आला आहे. सेन्सेक्समध्ये झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज बीएसईने (BSE)  सुरुवातीला एकूण 964 कंपन्यांमध्ये व्यवहार सुरू केले, त्यापैकी सुमारे 573 शेअर्स वाढले होते तर 332 शेअर्सच्या घसरणीने सुरुवात झाली होती. 59 कंपन्यांचे शेअर्स स्थिर दिसले आहेत.