सेन्सेक्स 32,000 वर कायम; निर्देशांक निफ्टीमध्ये ९०अंशांची वाढ

पीटीआय
Friday, 29 May 2020

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३३अंशांनी वधारून३२हजार ४२४ अंशांवर स्थिरावला.तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९०अंशांची वाढ झाली.तो ९ हजार५८० पातळीवर बंद झाला.

मुंबई - जगभरात अर्थचक्र पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे संकेत आणि कोरोनावर लस  येण्याबद्दल आशावाद या सकारात्मकतेने भांडवली बाजारात शुक्रवारी तेजी होती. मात्र दुसरीकडे कोरोनामुळे अमेरिका-चीनमध्ये व्यापारी संघर्ष पुन्हा भडकण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३३ अंशांनी वधारून ३२ हजार ४२४ अंशांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९० अंशांची वाढ झाली. तो ९ हजार ५८० पातळीवर बंद झाला.

शेअर बाजारात संमिश्र वातावरण
कोरोनावर लस मिळण्याबाबत आशावाद आणि कोरोना आणि हाँगकाँगवरून चीन आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. 

स्पेक्ट्रम लिलावामुळे दूरसंचार क्षेत्रावरील कर्ज वाढण्याची शक्यता

सेन्सेक्समध्ये दोन दिवसात १५०० अंशांची वाढ
शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी सकारात्मक पातळीवर बंद झाला आहे. परिणामी तीन दिवसात सेन्सेक्स १५०० हून अधिक अंशांनी वधारला आहे.  जागतिक स्तरावरील भांडवली बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या परिणामाने देशांतर्गत बाजारात खरेदीचा उत्साह शुक्रवारी दिसून आला.

क्षेत्रीय पातळीवर रिअल्टी, फार्मा आणि एफएमजीसी कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदीचा उत्साह होता. 

एअर इंडिया कर्मचारी संघटनांनी मागितले ५०,००० कोटींचे आर्थिक पॅकेज

सेन्सेक्सच्या मंचावर बजाज ऑटो, सन फार्मा, आयटीसी, एलअँडटी आणि एशियन पेंटचे शेअर सर्वाधिक वधारले होते. तर  ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक,  बजाज फायनान्स, टाटा स्टील, इन्फोसिस, एचडीएफसी आणि आयसीआयसीआयच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex stable on 32,000 points Nifty rises by 90 points