शेअर बाजाराची दिशा आता कशी राहील?

राजेंद्र सूर्यवंशी
सोमवार, 16 एप्रिल 2018

शेअर बाजारासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून वाईट वा खराब बातम्या येत असल्या तरी शेअर बाजार त्याकडे काणाडोळा करीत मूल्यांकनाच्या आधारे आपली दिशा सुनिश्‍चित करीत राहील, असे वाटते. दुसरीकडे देशांतर्गत बातम्या सध्या चांगल्या येत आहेत. किरकोळ चलनवाढीचे व औद्योगिक उत्पादनवाढीचे आकडे उत्तम आहेत. औद्योगिक उत्पादनात मागील अनेक वर्षांपासून आलेली मरगळ आता दूर होत असल्याचे दिसत आहे. एक ऑक्‍टोबर २०११ पासून ते डिसेंबर २०१७ पर्यंत जे उत्पादन उणे २.५ ते ३.५ या दरम्यान राहत होते, ते आता वरच्या दिशेने वाढताना दिसत आहे. डिसेंबर २०१७ पासून जी वाढ होत आहे, ती उत्साह वाढविणारी आहे. सोबत चलनवाढही नियंत्रित आहे.

शेअर बाजारासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून वाईट वा खराब बातम्या येत असल्या तरी शेअर बाजार त्याकडे काणाडोळा करीत मूल्यांकनाच्या आधारे आपली दिशा सुनिश्‍चित करीत राहील, असे वाटते. दुसरीकडे देशांतर्गत बातम्या सध्या चांगल्या येत आहेत. किरकोळ चलनवाढीचे व औद्योगिक उत्पादनवाढीचे आकडे उत्तम आहेत. औद्योगिक उत्पादनात मागील अनेक वर्षांपासून आलेली मरगळ आता दूर होत असल्याचे दिसत आहे. एक ऑक्‍टोबर २०११ पासून ते डिसेंबर २०१७ पर्यंत जे उत्पादन उणे २.५ ते ३.५ या दरम्यान राहत होते, ते आता वरच्या दिशेने वाढताना दिसत आहे. डिसेंबर २०१७ पासून जी वाढ होत आहे, ती उत्साह वाढविणारी आहे. सोबत चलनवाढही नियंत्रित आहे. या आठवड्यापासून मार्च २०१८ च्या तिमाहीचे निकाल सुरू होत असून, या बाजूने बाजाराला कमी अपेक्षा आहेत. त्यामुळे निकालांमुळे बाजार फार घसरणार नाही.

कच्चे तेल ७२ डॉलर प्रति पिंप या भावाच्या वर सरकले असून, यात अजून वाढ होण्याची भीती बाजाराला राहील. त्यातच अमेरिका-रशिया-सिरीया-इराण असा नवा वाद सुरू झाला असून, यामुळे कच्च्या तेलाचे भाव पुन्हा वाढण्याची शक्‍यता आहे. बाजाराला केवळ या बाजूनेच धास्ती राहील. या धास्तीत जर ‘निफ्टी’ १०,३४० अंशांपर्यंत घसरला तर पुन्हा खरेदीसाठी संधी असेल.

तांत्रिक कल कसा राहील?
मागील शुक्रवारी ‘निफ्टी’ १०,४९० अंशांवर बंद झाला असून, तेथून ‘निफ्टी’साठी १०,३४० व १०,६३० अंश या पातळ्या महत्त्वाच्या आहेत. चालू वाढ १०,६३० अंशांपर्यंत होण्याची शक्‍यता असून, त्याच्या वर ‘निफ्टी’ लगेच जाण्याची शक्‍यता दिसत नाही. खालच्या बाजूला १०,३४० अंश ही पातळी महत्त्वाची असून, येथपर्यंत ‘निफ्टी’ घसरण्याची शक्‍यता आहे. जागतिक पातळीवरून अचानक खराब बातमी आली नाही तर या पातळीवरून ‘निफ्टी’ पुन्हा १०,६३० अंशांच्या दिशेने वाढण्याची शक्‍यता आहे. 
(डिस्क्‍लेमर - लेखक शेअर बाजाराचे विश्‍लेषक-संशोधक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार, वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्याच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही.)

Web Title: share market