शेअर बाजार अखेर सावरला

पीटीआय
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

मुंबई - खनिज तेलाच्या भावातील घसरण आणि डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया यामुळे शेअर बाजार गुरुवारी सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ११८ अंशांची वाढ होऊन ३५ हजार २६० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४० अंशांची वाढ होऊन १० हजार ६१६ अंशांवर बंद झाला. 

डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया, आशियाई शेअर बाजारांमधील तेजी आणि युरोपीय शेअर बाजारातील सुरवातीच्या सत्रातील वाढ यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण निर्माण झाले. 

आगामी काळात अस्थिरता?
अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार कराराबाबतची अनिश्‍चितता कायम आहे. याचबरोबर अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’कडून डिसेंबरमध्ये व्याजदरात वाढ होण्याची शक्‍यता आहे. यामुळे आगामी काळात शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण राहील, असा अंदाज शेअर दलालांनी व्यक्त केला.

जेट एअरवेज तेजीत 
आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचा ताबा टाटा समूह घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर जेट एअरवेजच्या समभागात आज २४.५२ टक्के वाढ नोंदविण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share Market